पूरग्रस्त विद्यार्थिनींसाठी वह्या पुस्तके वाटप-राजपूत परिवार व सन्मान परिवार चा उपक्रम
जळ्गाव जा / प्रतिनिधि
शहरातील नगर परिषद शाळांच्या पूरग्रस्त विद्यार्थ्यांना आज सुनगाव येथील उद्योजक अशिषसींह राजपूत व सन्मान परिवार जळ्गाव जा यांच्या सयुक्त विद्यमाने वह्यापुस्तके वाटुन मदत करण्यात आली.
सविस्तर वृत्त असे की,
दी 11 ला श्री. छत्रपती शिवाजी महाराज न .प. मराठी प्रा. शाळा क्रमांक ३ येथे सन्मान ग्रुपच्या संकल्पनेतून राजपूत परिवार सुनगाव च्या वतीने व नगरपरिषद प्रशासन यांच्या सहकार्यने
22 जुलै 2023 रोजी महापुरात घरांचे नुकसान झालेल्या विद्यार्थ्यांना मोफत वह्या ,पुस्तक, पेन ,पेन्सिल चित्रकला साहित्य वाटप करण्यात आले.. 5 शाळांचे 100पेक्षा जास्त विद्यार्थी यावेळी लाभन्वित झाले.
यावेळी मंचावर न. प. मुख्याधिकारी आकाश डोईफोडे , सन्मान ग्रुपचे फाफट सर , मुख्याध्यापक ठेंग सर
छायाचित्रकार व पत्रकार आश्विन राजपूत,श्रीमती विजयाबाई राजपूत,अशिषसींह राजपूत, व इतर मान्यवर उपस्थीत होते.तसेच कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी
जि. प .केंद्रप्रमुख नितीन सातव,नगरपरिषद कर्मचारी, क्षेत्रातील सर्व न.प.शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद यानी परिश्रम घेतले.
तसेच पत्रकार बंधू व महापुरातील बाधित विद्यार्थी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री महादेव सातव , प्रास्ताविक श्री. आर. पी. ठेंग, .. तर आभार प्रदर्शन श्री.वाहिद सर यांनी मानले.
मंचावर आश्विन राजपूत,फाफट सर,मुख्याधिकारी डोईफोडे ,तसेच चिमुकल्या विद्यार्थीनी नी संवाद साधला.वृक्षरोपण करुन कार्यक्रमा ची सांगता झाली.