जवळा येथील शिक्षक राजेंद्र खोसे प्राध्यापक पदासाठी विशेष प्राविण्याने पात्र .
पारनेर [ श्री सुरेश खोसे पाटील यांजकडून ] – रयत शिक्षण संस्थेच्या जवळा येथील श्री धर्मनाथ विदयालयात कार्यरत असणारे राजेंद्र भास्कर खोसे हे नुकतेच सहाय्यक प्राध्यापक पदासाठी घेण्यात आलेल्या पात्रता परीक्षेत विशेष प्राविण्याने इंग्रजी विषयाच्या सेट परीक्षा पात्र झाले आहेत .
पुणे येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने नुकतेच सहाय्यक प्राध्यापक पदासाठी, उमेदवारांची पात्रता निश्चित करण्यासाठी, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, राज्य पात्रता परीक्षा ७ एप्रिल रोजी घेण्यात आलेल्या सेट परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. एकूण निकाल शेकडा ६ . ६६ टक्के इतका कमी लागला .
शिक्षक राजेंद्र भास्कर खोसे हे पाडळी दर्या येथील असून श्री धर्मनाथ विद्यालय जवळा येथे उपशिक्षक पदावर कार्यरत आहे . इंग्रजी विषयात सेट परीक्षा पात्र ठरले. बालपणापासून अत्यंत हुशार असलेले शिक्षक राजेंद्र खोसे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेवून राज्यातील सर्वांत मोठ्या रयत शिक्षण संस्थेत त्यांची उपशिक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली . त्यांच्या यशाचे पारनेर तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात विशेष कौतूक होत आहे .