लाखनी येथील बडगे सेलीब्रेशन सभागृहात संवीधान संघर्ष समीतीची बैठक संपन्न
लाखनी – अलीकडे केंद्रातील भाजप व राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या संवीधानविरोधी कारवाया सुरू आहेत. लोकशाहीला बाधक असणारे बरेच निर्णय विदयमान केंद्र सरकार व राज्य सरकार घेत आहे. सरकारच्या खाजगीकरण , कंत्राटीकरण व आरक्षणविरोधी धोरणांमुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. नव्या शैक्षणिक प्रणालीमुळे तळागाळातील समाज शिक्षणापासून कोसो दूर राहणार आहे. एकंदरीत मानवी हक्क व अधिकारांचे हनन करून संविधान नष्ट करण्याचा आटोकाट प्रयत्न केला जात आहे. या सर्व प्रकाराला आळा घालण्यासाठी कुठंतरी संवीधानाचा बचाव करणे गरजेचे आहे.
याच पार्श्वभूमीवर लाखनी येथे संवीधान बचाव समीतीची सर्वजातीय बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीच्या अध्यक्षपदी संवीधान बचाव समीतीचे भंडारा जिल्हाध्यक्ष रोशन जांभुळकर प्रामुख्याने हजर होते तर प्रमुख अतीथी म्हणून ओबीसी सेवा संघाचे लाखनी तालुकाध्यक्ष प्रा. उमेश सिंगनजुडे , संवीधान बचाव समीतीचे भंडारा जिल्हा कार्यकारीणीतील कार्याध्यक्ष अचल मेश्राम , महाप्रज्ञा बुद्ध विहाराचे अध्यक्ष सुरेंद्र बन्सोड , क्रांतीज्योती महीला संघटनेच्या अध्यक्षा अश्वीनीताई भिवगडे व भारतीय मानवाधिकार असोसिएशनच्या भंडारा जिल्हा माहीला अध्यक्ष डॉ.वैष्णवी लेंडे उपस्थित होत्या.
संवीधान बचाव समीतीच्या बैठकीत उपस्थित मान्यवरांनी वर्तमानकालीन राजकीय परीस्थीतीवर भाष्य केले तसेच संवीधानातील तरतुदींचे काटेकोरपणे पालन करून जातीनिहाय जनगणना करण्याविषयीची आपली भुमिका स्पष्ट केली. यामध्ये प्रमुख अतीथींपैकी अचल मेश्राम , अश्वीनीताई भिवगडे , सुरेंद्र बन्सोड , नरेश इलमकर , प्रा. उमेश सिंगनजुडे व प्रा. विजयकांत बडगे इ. नी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुरेश खोब्रागडे यांनी केले तर आभार घनश्याम अतकरी यांनी मानले.