राजा रघुवंशी हत्या कांडात नवा ट्विस्ट , राजाच्या मोबाईल मध्ये सापडले 10.रु च्या अर्ध्या नोट चे फोटो

शिलाँग पोलिसांना हवाला रॅकेट चा संशय
राजा रघुवंशी हत्याकांडात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. यांमुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.कारण पोलिसांना आपल्या तपासाची दिशा बदलावी लागत आहे. नुकताच या प्रकरणात सोनम च्या समलैंगिक असल्याबद्दल पोलिसांना संशय होता. पण आता शिलाँग पोलिसांना राजाच्या मोबाईल मध्ये 10 रु च्या अर्ध्या फाटलेल्या नोटेचा फोटो आढळल्याने शिलाँग पोलिसांनी इंदूर पोलिसांना मणिलंड्रिंग च्या ऍगल ने तपास करण्याचे सुचविले आहे. त्यानंतर शिलाँग पोलिसांच्या माहितीवरून इंदौर गुन्हे शाखेने हवालाशी संबंधित कागदपत्रे, डिजिटल डेटा आणि रोख व्यवहारांचे तपशील अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) सोपवले आहेत.
हवाला व्यवसाय कसा चालतो?
इंदौरच्या राजा रघुवंशी हत्या प्रकरणात शिलाँग पोलिसांना एक नवीन अँगल सापडलाय. राजा रघुवंशी हत्येत हवाला व्यवसायाचे पुरावे पोलिसांना मिळाले आहेत. आतापर्यंत पोलीस या हत्येचा तपास प्रेम त्रिकोणावर करत होते, परंतु हवालाची तार या हत्येशी जोडल्या गेल्यानंतर पोलिसांनी आपल्या तपासाची व्याप्ती वाढवली आहे. शिलाँग पोलिसांना या हत्येचा सूत्रधार राज याच्या मोबाईलमधून फाटलेल्या 10 रुपयांच्या नोटांचे काही फोटो सापडले आहेत, ज्या हवाला व्यवसायासाठी वापरल्या गेल्या असण्याची शक्यता आहे. हवाला व्यवसायात दहा रूपयांची अर्धी फाटलेली नोट का वापरतात? हवाला व्यवसाय कसा चालतो, हे आपण सविस्तर जाणून घेऊ या.
हवाला व्यवसाय म्हणजे काय?
भारतात हवाला व्यवसाय बेकायदेशीर आहे. तो काळा पैसा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हस्तांतरित करण्यासाठी वापरला जातो. उदाहरणार्थ, जर एखाद्याला मुंबईहून दिल्लीला 50 लाख रुपये हस्तांतरित करायचे असतील, तर तो मुंबईतील हवाला डीलरच्या एजंटला 50 लाख रुपये देईल आणि त्या बदल्यात अर्धी 10 रुपयांची नोट देईल. आता फाटलेली 10 रुपयांची नोट ज्या व्यक्तीला 50 लाख रुपये देणार होते त्याला दिली जाते, त्यानंतर दिल्लीतील ज्या व्यक्तीला पैसे घ्यायचे आहेत, तो फाटलेली 10 रुपयांची नोट येथे उपस्थित असलेल्या हवाला डीलरला देतो. त्यानंतरच त्याला 50 लाख रुपये दिले जातील. या हवाला व्यवसायात पैसे ट्रान्सफर करणाऱ्या व्यक्तीला काही कमिशन देखील मिळते.
मनी लाँडरिंगचा अँगल
राजा रघुवंशी यांच्या खून प्रकरणात हवाला व्यवसायाचे दुवे आढळल्यानंतर, शिलाँग पोलिसांच्या माहितीवरून इंदौर गुन्हे शाखेने हवालाशी संबंधित कागदपत्रे, डिजिटल डेटा आणि रोख व्यवहारांचे तपशील अंमलबजावणी संचालनालय (ईडी) कडे सोपवले आहेत. ईडी आता मनी लाँड्रिंगच्या दृष्टिकोनातून या प्रकरणाच्या तळाशी जाण्याची तयारी करत आहे. इंदूर गुन्हे शाखेने गोविंद रघुवंशी यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे. गोविंद यांचा प्लायवूड आणि लॅमिनेशन व्यवसाय, श्री बालाजी अॅक्टोरियो, हा हवालाचा एक भाग असल्याचे मानले जाते.