क्राइम

कपाळावर टिकली लावल्याने शिक्षकाची मारहाण आणि विद्यार्थिनींची आत्महत्या 

Spread the love

रांची ( झारखंड ) / नवप्रहार वृत्तसेवा

                      कपाळावर टिकली लावून आलेल्या विद्यार्थिनीला बेदम मारहाण केल्याने राग आलेल्या विद्यार्थिनीने गळफास घेत आपले जीवन संपवल्याची घटना झारखंड राज्यात घडली आहे. गावकऱ्यांच्या निदर्शना नंतर पोलिसांनी शिक्षकाला अटक केली आहे.

झारखंड पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार , तेतुलमारी भागात नुकतीच ही घटना घडली. मयत विद्यार्थीनीचे पालक आणि स्थानिक नागरिकांनी शाळा व्यवस्थापनाविरोधात निदर्शने केली. यानंतर पोलिसांनी घटनेचे गांर्भीय ओळखत गुन्हा दाखल केला.

पीडित मुलगी धनबादच्या तेलतुलमारी भागातील एका कॉन्व्हेंट शाळेत शिकत होती. ही विद्यार्थीनी कपाळावर टिकली लावून शाळेत पोहोचली. त्यामुळे रागाच्या भरात शिक्षकाने या मुलीच्या कानशिलात भडकावली. यानंतर सदर विद्यार्थिनीने घरी येताच फाशी घेतली.

पीडितेने आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली. यामध्ये तिने शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांना जबाबदार धरले आहे. आता पिडीतेच्या पालकांनी दोन्ही शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

धनबादच्या बाल कल्याण समितीचे अध्यक्ष उत्तम मुखर्जी यांनी सांगितले की, पोलिसांनी आरोपी शिक्षकाला अटक केली आहे. हा एक गंभीर मुद्दा आहे. या शाळेचा सीबीएसईशी काहीही संबंध नाही.

या घटनेची माहिती जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. प्रियांक कानुंगो यांनी सांगितले की, आम्ही या प्रकरणाची दखल घेतली आहे. तपासासाठी पथक धनबादला पाठवण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close