हटके

पोलिसाकडून फिलिस्तीनी दहशतवाद्यां साठी पैशाची मागणी 

Spread the love

 बरेली / नवप्रहार,मीडिया 

               एकीकडे पोलिसात भरती व्यक्ती देशाप्रती एकनिष्ठ राहण्याची आणि दवंशसेवा करणयाची शपथ घेतो .तर दुसरीकडे मात्र पोलीसाचा  अजब प्रकार पहायला मिळत आहे. पोलीस फिलिस्तानी दाहशतवाद्यांसाठी पैशे मागत असल्याचा धक्कादायक आणि लज्जास्पद प्रकार उघड झाला आहे. घटना उत्तरप्रदेश च्या बरेली येथील आहे.  सोशल मीडियावरून याची तक्रार केल्यानंतर प्रकरण चौकशीसाठी सायबर सेल।कडे देण्यात आले आहे.

लोकांनी पोलीस अधिकाऱ्यांना टॅग करत त्याचे स्क्रीन शॉट पाठवत तक्रारी केल्या आहेत. तसेच या शिपायाविरोधात कारवाईची मागणी केली आहे.

सुहेल अन्सारी असे या पोलीस शिपायाचे नाव आहे. एसएसपीनी सायबर पोलिसांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या चौकशीचा अहवाल तत्काळ द्यावा असेही सांगण्यात आले आहे.

अन्सारीने त्याच्या फेसबुक अकाऊंटवरून लोकांकडे ही मागणी केली आहे. लोकांनी या पोलीसाचे प्रोफाईल आणि त्याने केलेली पोस्ट पोलिसांना पाठविली आहे. त्याने पोस्ट शेअर करण्यासही सांगितले आहे. तसेच एक पोस्ट शेअर केली की एक डॉलर मिळणार असल्याचेही म्हटले आहे. तसेच जो पैसा द्याल तो इस्लामिक रिलिफ युएसएच्या अकाऊंटला थेट पाठवा असेही त्याने म्हटले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close