सामाजिक

१ एप्रिल पासून रेल्वे च्या नियमात होणार बदल 

Spread the love

विना तिकीट प्रवास करताना आढळल्यास होईल असे 

नवी दिल्ली / नवप्रहार मीडिया 

               रेल्वेत सर्व सोयी सुविधा असल्याने प्रवाशी रेल्वे प्रवासाला पहिली पसंती देतात. पण रेल्वेचे तिकीट बुकिंग चे नियम असल्याने प्रवाश्याला त्याचे पालन करावे लागते. अनेक वेळा कुठे अर्जंट जायचे असल्याने काही लोकांचे तिकीट काढण्याचे राहून जाते. तर काही लोक ‘ पहिल्या जाईल ‘ या मानसिकतेचे असल्याने जाणून तिकीट काढत नाहीत.रेल्वेने १ एप्रिल पासून आपल्या नियमात बदल केला आहे. त्यामुळे प्रवास करताना  ही काळजी घ्या.

देशभरातील दररोज कोट्यावधी प्रवासी रेल्वेने ये-जा करत असतात. भारतीय रेल्वेकडून प्रवाशांच्या सोयीसाठी विविध सुविधा दिल्या जातात. त्यातच आता भारतीय रेल्वेने 1 एप्रिलपासून म्हणजेच आजपासून रेल्वेच्या नियमांत मोठा बदल केला आहे.

आता भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी 1 एप्रिलपासून आपल्या नियमात मोठा बदल केला आहे. रेल्वेच्या या नव्या नियमामुळे रेल्वेने विना तिकीट प्रवास करणे प्रवाशांना महागात पडू शकते. जर विना तिकीट रेल्वेमध्ये प्रवास करताना पकडले गेलात तर आता ऑनलाईन दंड भरावा लागू शकतो. भारतीय रेल्वेने हा दंड भरण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करत फुकट्या प्रवाशांकडून दंड आकरण्याची पद्धत सुरु केली आहे. भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी 1 एप्रिलपासून आपल्या नियमात मोठा बदल रेल्वे करणार आहे. या नियमामुळे रेल्वेने विनातिकीट प्रवास करणे प्रवाशांना महागात पडू शकते. त्यामुळे प्रवाशांकडून आता क्यूआर कोड स्कॅन करुन दंड वसूल केला जाणार आहे. यासाठी रेल्वे तिकीट तपासणीसांना हँडहोल्ड टर्मिनल मशीन प्रदान करण्यात येणार आहे. प्रवासादरम्यान विनातिकीट पकडले गेल्यास आणि कॅश नसेल तर अशावेळी डिजीटल पेमेंट करु शकतो आणि तुरुंगात जाण्यापासून वाचू शकतो.

तसेच रेल्वे तिकीट घरांसमोरील प्रवाशांची गर्दी पाहता महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तिकीट खरेदी करताना पेमेंटशी संबंधित समस्या अनेकांना उद्भवतात. आता प्रवाशांना रेल्वे स्थानकांवरील तिकीट काउंटवरुन तिकीट खरेदी करताना क्यूआर कोड स्कॅन करण्याचा पर्याय मिळणार आहे. यासाठी गुगल पे आणि फोन पे सारख्या UPI अॅप्सद्वारे प्रवासी त्यांच्या सोयीनुसार पेमेंट करु शकणार आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
1
+1
0
+1
1
+1
0
+1
1
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close