क्राइम

रेल्वेच्या मुख्य कार्यालय निरीक्षकाला 50 हजाराची लाच घेताना अटक 

Spread the love

मुंबई, / नवप्रहार मीडिया

                     कंपनीच्या कामाचे बिल काढून देण्यासाठी लाच मागणाऱ्या डीआरएम कार्यालयाच्या कार्यालय निरीक्षकाला कंपणीच्या प्रतिनिधीकडून लाच स्वीकारतांना सीबीआय कडून रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.खासगी कंपनीच्या सुमारे 4 कोटी 80 लाख रुपयांच्या बिलासंदर्भात पुढील प्रक्रिया करण्यासाठी कंपनीच्या प्रतिनिधीकडे 50 हजार रुपयांची लाच मागण्यात आली होती.

सदर खासगी कंपनीच्या प्रतिनिधीने या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. आरोपीच्या परिसरातील दोन ठिकाणी घातलेल्या धाडीत सापडलेली दोषपूर्ण कागदपत्रे आणि स्थावर तसेच जंगम मालमत्ता सीबीआयने ताब्यात घेतली आहेत.

पश्चिम रेल्वेला साहित्याचा पुरवठा करणाऱ्या खासगी कंपनीची बिले चुकती करण्यासाठी तक्रारदाराकडे लाच मागितल्याच्या आरोपाखाली सीबीआय आरोपीविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली आहे. या प्रकरणी दाखल तक्रारीत असे म्हटले आहे की ही खासगी कंपनी पश्चिम रेल्वेची नियमित पुरवठादार असून साहित्याचा पुरवठा केल्यानंतर पैसे मिळण्यासाठी ही कंपनी पश्चिम रेल्वेकडे बिले सादर करत असे. सदर कंपनीतर्फे तक्रारदार (खासगी कंपनीचा प्रतिनिधी) वेळेवर बिले मंजूर होऊन कंपनीला पैसे मिळण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या लेखा विभागाकडे नियमितपणे पाठपुरावा करतो. नुकतेच सदर कंपनीने पश्चिम रेल्वेला काही साहित्य पुरवले आणि त्याचे सुमारे 4 कोटी 80 लाख रुपयांचे बिल पश्चिम रेल्वेच्या लेखा विभागाकडे सादर केले. तक्रारीत असे म्हटले आहे की या प्रकरणातील आरोपी पश्चिम रेल्वेच्या मुंबईस्थित डीआएम कार्याकायात लेखा विभागात प्रक्रिया अधिकारी म्हणून कार्यरत आहे. मुख्य कार्यालय अधीक्षक पदावर कार्यरत असलेल्या सदर आरोपीने उपरोल्लेखित बिलावर कार्यवाही करण्यासाठी तक्रारदाराकडून दर लाखाला शंभर रुपये या प्रमाणे 4 कोटी 80 लाख रुपयांच्या बिलासाठी (सुमारे 50,000 रुपये) लाच मागितली असा आरोप आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close