प्रकल्पग्रस्त कामगारांचे कामगार आयुक्तांना निवेदन
रतन इंडिया कंपनीचे निवेदन घेण्यास नकार दिला – प्रफुल तायडे
अमरावती / प्रतिनिधी
रतन इंडिया कंपनीतील प्रकल्पग्रस्त कर्मचारी यांच्या वेतनवाढीसाठी शिवसेना प्रणित राष्ट्रीय कर्मचारी सेनेकडून कामगार आयुक्त कार्यलायत धडक देण्यात आली. तर मागील वर्षी रतन इंडिया कंपनीच्या प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांनी अनेक निवेदन दिली होती.
परंतु कंपनी कडून यावर्षी पगारवाढ देण्यात येईल असे लेखी पत्र दिले होते मात्र कंपनीने यावर्षी ही प्रकल्पग्रस्त कर्मचारी यांची पगारवाढ केली नाही. तर याविषयी महाराष्ट्र राज्य श्रमिक संघाचे अध्यक्ष आमदार किरण पावस्कर यांना प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांची कैफियत सांगितली तर राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे सरचिटणीस कोणार्क देसाई यांनी याविषयी तात्काळ निर्णय घेत देसाई यांच्या आदेशानुसार शिवसेना प्रणित राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे जिल्हाप्रमुख प्रफुल तायडे राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे सहचिटणीस वेदांत तालन मार्गदर्शक महेंद्र गाडे व मोठ्या प्रमाणावर कर्मचारी वर्गाने आज कामगार आयुक्त कार्यलायत धडक दिली.
पगारवाढ झाली नाही तर आंदोलन करू – कामगारांचा ईशारा
प्रकल्पग्रस्त कामगारांच्या पगारवाढीबाबत जर योग्य निर्णय कपंनीच्या वतीने झाला नाही तर आठ दिवसाने आंदोलनाची भूमिका घेतली जाईल असा ईशारा कामगारांनी निवेदनातून दिला आहे.
बॉक्स
आम्ही रतन इंडियाच्या मानव संसाधन विभागाच्या मेहफूस आलम यांच्याकडे निवेदन द्यायला गेलो असता आमचे निवेदन न घेता राज्याचे मुख्यमंत्री यांना मी ओळखत नसल्याचा दुजोरा देत कामगारांचे निवेदन घेण्यास नकार दिला तर मानव संसाधन विभागाचे प्रमुख सेधू माधवन यांनी भेट च नाकारली राज्याच्या मुख्यमंत्र्याची ओळख कंपनीला नसावी हे दुर्भाग्य आहे – प्रफुल तायडे
जिल्हाध्यक्ष कामगार सेना