राधे गणेश मंडळाला सलग दुसऱ्यांदा आदर्श गणेशोत्सवाचा प्रथम पुरस्कार
पोलीस विभागाचा पुरस्कार सोहळा संपन्न*
नांदगाव खंडेश्वर/ प्रतिनिधी
आदर्श गणेशोत्सव मंडळाचा २०२३ या वर्षीचा प्रथम पुरस्कार सलग दुसऱ्यादा स्थानिक शहरातील राधे गणेशोत्सव मंडळाला मिळाला असून उपविभागीय पोलीस अधिकारी सूर्यकांत जगदाळे यांचे हस्ते पुरस्कार वितरण सोहळा पार पडला
दर वर्षी पोलीस विभागाच्या वतीने आदर्श गणेशोत्सव पुरस्कार देण्यात येत असतो ज्या मंडळाने सामाजिक धार्मिक उपक्रम राबविले अश्या मंडळाला हा पुरस्कार देण्यात येतो या वर्षी ठाणेदार विशाल पोळकर यांनी गावातील प्रतिष्ठित व्यक्तींची समिती तयार करून त्या मध्ये ऑडो प्रवीण ठाकरे पत्रकार सुरेशराव ढवळे ह भ प उमेश जाधव डॉ मंगेश पचगडे पो पा संजय जुनघरे पोलीस कर्मचारी सतीश गावंडे निखिल मेटे यांचा समावेश होता राधे गणेश मंडळाने अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांला मदत आरोग्य तपासणी शिबीर मतदार जनजागृती मच्छर फवारणी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व्यसनमुक्ती गुणवंत विद्यार्थी राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार विसर्जन मिरवणुकीत बैलजोडी रत गुलाल ढोल ताशे याला फाटा देत पारंपरिक वारकरी दिंड्या लेझीम पथम शासनाचा माझी माती माझा देश हा उपक्रम इत्यादि उपक्रम राधे गणेश मंडळाने राबविले याचें समितीने गुणांकन करून आदर्श गणेशोत्सव प्रथम पुरस्कार म्हणून राधे गणेशोत्सव मंडळाला प्रथम पुरस्कार देण्यात आला कार्यक्रमाला माजी सैनिक उत्तमसिंग बैस उपविभागीय पोलीस अधिकारी सूर्यकांत जगदाळे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सदानंद जाधव गटविकास अधिकारी प्रकाश नाटकर सिनेट सदस्य नितीन टाले अक्षय पारस्कार संजय पोफळे इत्यादीच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला यावेळी ठाणेदार विशाल पोळकर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते
*राधे गणेशोत्सव मंडळाने सामाजिक उपक्रम सामाजिक कार्यकर्ते प्रकाश मारोटकर व राहुल गुलहाने यांच्या मार्गदर्शनात राबविले असल्याची प्रतिक्रिया मंडळाचे अध्यक्ष अक्षय हिवराळे यांनी व्यक्त केली*