रासेयो स्वयंसेवक यांचा स्तुत्य उपक्रम ; बेघर लाभार्थीना स्वेटर चे वाटप
रासेयो स्वयंसेवक यांचा स्तुत्य उपक्रम ; बेघर लाभार्थीना स्वेटर चे वाटप
*समाजशास्त्र विषयांचे विद्यार्थीनी केस स्टडीच्या माध्यमातून समस्या जाणून घेतल्या
गोंदिया – दीनदयाल अंत्योदय योजना व नागरी उपजीविका अभियानाअंर्त सिव्हिल लाईन येथिल सावली बेघर निवारा केंद्र येथिल लाभार्थीना एन.एम.डी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना च्या स्वयंसेवक यांनी 11 आॕक्टोबर रोजी जागतिक बेघर दिनाचे औचित्य साधून लाभार्थीना स्वेटर चे वाटप केले.
गोंदिया शिक्षण संस्था द्वारा संचालित नटवरलाल मानिकलाल दलाल महाविद्यालयतील राष्ट्रीय सेवा योजनाच्या स्वयंसेवक यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शारदा महाजन यांच्या मार्गदर्शनात व रासेयो माजी जिल्हा समन्वयक डॉ.बबन मेश्राम यांच्या पुढाकाराने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथि व जागतिक बेघर निवारा दिनानिमित्त जनजागृति रैली काढून सावली बेघर निवारा केंद्र येथे आॕक्टोबर जागतिक बेघर दिन निमित्त करनकुमार चौहान मुख्यधिकारी तथा प्रशासक न. प. गोंदिया यांच्या मार्गदर्शनात
जागतिक बेघर दिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लायंस क्लब अध्यक्ष दीपक कदम, डॉ.बबन मेश्राम ,व्यवस्थापक धनराज बनकर,व्यवस्थापक सुनंदा बिसेन ,संचालक तथागत क्रीड़ा संस्था मोहनिष नागदवने, राहुल वालदे , सौ मोनालि नागदवने ,.सौ. रमा मिश्रा, ज्योसना बोभार्डे ,सौ किरण फुले, सौ. अश्विनी मेश्राम ,सौ.मनीषा हटवार ,आनन्द रामटेक,डॉ. वर्षा बोरकर, रत्ना लामकासे, सरोज दुबे, प्रमुख उपस्थितीत केक कापून उत्साहात साजरा करण्यात आला.
त्यांनतर नर्मदा फॅमिली स्टोर्स चे मालक नंदलाल माणकानी व संचालक आशीष माणकानी यांच्या सहकार्याने निवारा केंन्द्रातील लाभार्थीना रासेयो स्वयंसेवक यांनी स्वेटरचे वाटप केले.
*समाजशास्त्र विभाग द्वारा
लाभार्थीची केस स्टडी*
एन.एम.डी महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागचे विद्यार्थीनी मा.पंतप्रधान यांची महत्वाकांक्षी योजना व सर्वोच्च न्यायालय यांचे आदेशानुसार दिनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिवीका अंर्तगत शहरी बेघरासाठी निवारा या घटका अंर्तगत शहरी भागात, रेल्वे स्टेशन, बसस्टाॅप,पुलाखाली , रस्तेचे कडेला ,मंदिराच्या बाहेर,अशा ठिकानी वास्तव्यास असणारे बेघर लोकांचे ऊन,पाऊस,वारा,थंडी पासून संरक्षण व्हावे या करीता नगरपरिषद गोंदिया यांचे माध्यमाने मागिल चार वर्षोंपासून कार्यरत आहे.या लाभार्थीना सन्मानाने जिवन जगता यावे ,त्यांचे समस्या,उपाययोजना या विषयी संशोधनात्मक अध्ययनातून निवारा केंन्द्रातील अपंग, निराश्रित, मतिमंद,वृध्द लाभार्थीना भेट देवून केस स्टडीच्या माध्यमातून समस्या जाणून घेतल्या व बेघरासाठी काय उपाययोजना करता येईल यावर अध्ययन केले.कार्यक्रमाचे संचालन कु. आरती ठाकरे व आभार प्रदर्शन प्रदीप गणवीर यांनी केले.यावेळी निवारातिल व्यवस्थापक राजेंद्र लिल्हारे, कर्मचारी निलेश बोरकर, दिलीप हटवर, रासेयो स्वयंसेवक रविन्द्र कावळे,मनिष दहिकर, सार्थक बोरकर,ज्ञामसिंग बघेले, स्वप्निल चंद्रिकापुरे, प्रणाली बन्सोड, मुस्कान मेश्राम,आर्या चव्हाण,स्नेहा डोंगरे, शिवानी बनकर, बुलबुल खोब्रागडे,मोहनी कोसले,अल्का बिसेन,भारती कटरे, ममता नाईक,पुनम वाघाडे, शिवानी हाडगे,पुजा लिल्हारे,खा शतबरवे, उज्वला शहारे,हिना लांजेवार, आरती मौजे, अश्विनी वालव्हे,पायल ठाकरे,पुनम गौतम,प्राची बोपचे,दिपिका बिसेन,अल्का बिसेन,विनय मेंढे,शाहिल रहांगडाले, राहुल पुसाम, कमलेश्वर रहांगडाले सह समाजशास्त्र विषयांचे विद्यार्थी व मान्यवर अधिक संख्येत उपस्थित होते.