गुणवत्ता यादीत झळकलेल्या विद्यार्थिनीचा महाविद्यालयातर्फे सत्कार
मोर्शी / तालुका प्रतिनिधी
श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित श्री आर आर लाहोटी विज्ञान महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागाची विद्यार्थिनी वैष्णवी प्रदीप महेंत ही 2023- 24 च्या परीक्षेत वनस्पती शास्त्र विषयामध्ये 10 वी मेरिट आली असून तिचा महाविद्यालयाच्या वतीने गुणगौरव सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जी एन चौधरी हे होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून विभाग प्रमुख डॉ गिरीश कांबळे,डॉ रवी धांडे,प्रा. विजय चव्हाण,डॉ सारिका जयसिंगपूरे,प्रा.
चित्रा नेरकर डॉ आतिष कोहळे उपस्थित होते.
वैष्णवी प्रदिप महेंत ही अमरावती विद्यापीठ अमरावती उन्हाळी 2024 या परीक्षेमध्ये वनस्पतीशास्त्र विषयांमध्ये विद्यापीठ गुणवत्ता यादीमध्ये अनुक्रमे दहावे स्थान पटकावले आहे तिच्या या चमकदार कामगिरीसाठी वनस्पतीशास्त्र विभागातर्फे वैष्णवी महेंत आणि तिच्या पालकांचा याप्रसंगी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व रोख पारितोषिक आणि प्रशंसापत्र देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी विभागाच्या डॉ.गिरीश कांबळे, डॉ रवी धांडे, प्रा. विजया चव्हाण,जगदीश सुर्वे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
सत्काराला उत्तर देताना कु. वैष्णवी महेंत हिने आपल्या यशाचे श्रेय महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक वर्ग व आई-वडिलांना दिले.
कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.