क्राइम

5 लाखांची खंडणी मागून महिलेला ब्लॅकमेल करणाऱ्या भामट्याला अटक 

Spread the love

नागपूर / विशेष प्रतिनिधी

                 महिला मित्राशी जवळीक वाढवत तिची अश्लील चित्रफीत तयार करून ती व्हायरल करण्याची धमकी देत तिला 5 लाखांची खंडणी मागणाऱ्या भामट्याला  बेलतरोडी पोलिसांनी रायपूर येथून अटक केली आहे. सुधांशू मुकेश पात्रे (वय २५ रा. राजनांदगांव, रायपूर, छत्तीसगड), असे अटकेतील आरोपी मित्राचे नाव आहे.

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुधांशू व महिलेची काही वर्षांपासून मैत्री होती. त्यांचे प्रेमसंबंध जुळले. या दरम्यान सुधांशू सदर महिलेची अश्लील चित्रफीत व छायाचित्रे काढले.

मात्र, काही महिन्यांपूर्वी महिलेचे दुसऱ्या एका युवकाशी लग्न झाले. त्यामुळे त्यांनी सुधांशूला भेटण्यास नकार दिला. हा राग मनात ठेवत सुधांशूने महिलेची अश्लील चित्रफीत व्हायरल करण्याची धमकी दिली. याशिवाय त्यांना पाच लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. त्यामुळे महिलेने बेलतरोडी पोलिसांत तक्रार केली. तक्रारीची चौकशी करीत, पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला.

त्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुकुंद कवाडे यांनी सापळा रचला. महिलेला सुधांशूच्या मोबाइलवर संपर्क साधण्यास सांगितले. ठरल्याप्रमाणे त्याने महिलेला पैसे घेऊन मोमीनपुरा परिसरात बोलाविले. पोलिसांनी त्याचे लोकेशन काढले. तो राजनांदगाव येथे असल्याची माहिती मिळाली.

कवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलिस निरीक्षक किशोर मालोकर, कर्मचारी सचिन लाचरवार, सुमेंद्र बोपचे, दिलीप कश्यप आणि आशा बोरकर यांच्या पथकाने सोमवारी सकाळी राजनांदगावमधून सुधांशुला अटक केली आणि नागपुरात आणले. सुधांशूविरुद्ध अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close