पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर जयंती साजरी
आर्वी वार्ताहर आर्वी शहरांमध्ये सकल धनगर समाज आर्वी आष्टी कारंजा घाडगे च्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या 299 व्या जयंतीनिमित्त भव्य बाईक रॅली काढण्यात आली दरम्यान आर्वी आगार येथे उपस्थित सर्व धनगर समाज बांधव भगिनींच्या उपस्थितीत अहिल्याबाई होळकर यांच्या फोटो प्रतिमेचे विमोचन करण्यात आले तसेच छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून गांधी चौक ते रोशन मंगल कार्यालय या मार्गाने भव्य रॅली काढण्यात आली दरम्यान पोलीस स्टेशन आर्वीला अहिल्याबाई होळकर यांचा फोटो प्रदान करण्यात आला तसेच शासकीय ग्रामीण रुग्णालय आर्वी येथे रुग्णांना फळ वाटप करून याप्रसंगी सर्व धनगर समाज बांधवांनी तंबाखूमुक्त ची शपथ सुद्धा घेतली समारोपिय कार्यक्रम डॉ अविनाश मातकर यांच्या अध्यक्षतेखाली व डॉ अविनाश लव्हाळे डॉ ऋषिकेश भाकरे डॉ पाटेकर अधिव्याख्याता बोबडे मॅडम अर्जुन शिंदे महादेवरावजी भाकरे यांचे उपस्थितीत संपन्न झाला याप्रसंगी डॉ लव्हाळे यांनी स्वतःच्या मनगटावर व बुद्धी कौशल्यावर अहिल्याबाई होळकरांनी उभे केलेले राज्य व त्यांच्या आयुष्यातील विविध प्रसंगावर विचार व्यक्त केले तसेच उपस्थित सर्व धनगर समाज बांधव भगिनींना आरोग्य शिक्षण या विषयावर मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवी गोहत्रे यांनी केले याप्रसंगी ओम राऊत साहिल राऊत दिलीपजी गायनर सुशिलाबाई शेषराव टरके काकू यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या कार्यावर प्रकाश टाकला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण शिरपूरकर यांनी तर आभार मंगेश कोल्हे यांनी मानले या भव्य दिव्य कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता तन-मन-धनाने आर्वी आष्टी कारंजा घाडगे या परिसरातील संपूर्ण गावातील धनगर समाजातील बांधवांनी मोठी उपस्थिती दर्शवून कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता खूप मोठा प्रतिसाद दर्शविला