प्रज्ञा बुद्ध विहार पुनर्वसन येथे ग्रंथ वर्षावास ग्रंथ समापन समारोह,
वुमेंन रेजिमेंट समता सैनिक दलाचे पतसंंचालन, शीलवंतांचा सत्कार, बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर विचारावर संगीताचा कार्यक्रम.
नेर:- नवनाथ दरोई
माणसाला आपल्या दारिद्र्याची, गरिबीची लाज वाटता कामा नये. लाज वाटायला हवी ती आपल्या अंगी असलेल्या दुर्गुणाची, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात समस्त जगाला वैचारिक,तर्कशील,वैज्ञानिक व बौद्धिक संपदा समाविष्ट असलेल्या बुद्ध आणि त्यांचा धम्म या जगविख्यात ग्रंथाचे विचारधन दिले. प्रज्ञा बुद्ध विहार कोहळा पुनर्वसन बुद्ध विहारात आषाढी पौर्णिमेपासून या ग्रंथाचे दैनंदिनी वाचन,डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कृत बापूराव रंगारी यांनी त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण तर्कशील वकृत्व शैलित, मधुर वाणीतुन या ग्रंथाचे वाचन केले. प्रस्तुत ग्रंथाचे समारोप सोमवारला करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभा जिल्हा उपाध्यक्ष यवतमाळचे आनंद भगत हे मंचावर विराजमान होते. कार्यक्रमाचे उद्घाटन नेर अर्बन बँकेचे महाप्रबंधक प्रदीप झाडे यांच्या शुभहस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे व प्रतिमेचे पूजन करून,मेणबत्ती पेटवून उद्घाटन करण्यात आले. यावेळी मंचावर अप्पाजी मैंद, उमेश मेश्राम, अशोकराव भोजराज, पवन जयस्वाल सुभाष लंबे, संजीव गुजर, शोभा झाडे, नरेंद्र डवले उपस्थित होते. यावेळी उमेश वूमेन सैनिक दलाचे पतसंंचालन झाले. मान्यवराच्या हस्ते सुबोधी बुद्ध विहार संदीप नगर,तथागत बुद्ध विहार अशोक नगर,नालंदा बुद्ध विहार नालंदा नगर,कोहळा पुनर्वसन येथे ग्रंथ वाचणारे बापूराव रंगारी, चंदा मिसळे,निलेश मोखड रोनिका गणवीर यांना शाल, पुष्प गुच्छ देउन गौरविण्यात आले.यावेळी विष्णू तवकार, बाळासाहेब सोनोने, विश्वनाथ गुजर,कल्पना डवले,दिलीप तलवारे,या शिलवंताचा सत्कार करण्यात आला. सायंकाळी बुद्ध, शाहू, फुले, आंबेडकर विचार धारेवर संगीताच्या कार्यक्रम ठेवण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन धम्मपाल तलवारे, सुत्रसंचालन हर्षवर्धन तायडे यांनी केले.