क्राइम

पुण्याच्या पॉश कॉलनीत सुरू होता वेश्याव्यवसाय ; पोलिसांची धाड

Spread the love

चार विदेशी तरुणींची सुटका

पुणे / नवप्रहार ब्युरो 

शहरातील हिंजवडी परिसरात पॉश कॉलनीत सुरू.असलेल्या वेश्याव्यवसायावर पोलिसांनी धाड टाकून थायलंड च्या चार तरुणींची सुटका केली आहे.आणि त्यांना या पेशात आणणाऱ्या याप्रकरणी परदेशी दलाल महिलेला पिंपरी चिंचवड पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाने हिंजवडी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

जास्त पैशांचे आमिष दाखवून थायलंडमधील चार तरुणींकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला जात होता. सोशल मीडियावरून या तरुणींचे फोटो पाठवून लोणावळ्यात व्हिला बुक करून या तरुणींकडून वेश्या व्यवसाय केला जात होता. याबाबत पिंपरी चिंचवड पोलिसांना माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून सापळा रचला, यानंतर पोलिसांनी थायलंडच्या या मुलींची सुटका केली. तसंच दलाल महिलेकडून 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

दुसरीकडे बुधवारी बीडमधूनही वेश्या व्यवसाय करणाऱ्या चार महिलांची सुटका करण्यात आली आहे. तर तीन जणांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेसच्या नावाखाली पत्नी आणि एक खासगी इसम यांच्या मदतीने राहत्या घरात महिलांना बोलवून वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती, यानंतर पोलिसांनी डमी ग्राहक पाठवून छापा टाकला, यात बीड जिल्ह्यातील तीन आणि पुणे जिल्ह्यातील एक अशा चार महिला आढळून आल्या. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close