अपघात

पुण्यात आणखी एक हिट अँड रन चे प्रकरण ; काही फूट नेले फरफटत

Spread the love

पुणे / नवप्रहार डेस्क

                    मागील काही दिवसांपासून पुण्यात हिट अँड रनच्या अनेक घटना घटत आहेत. पिंपळे गुरव मेन बस स्टॉप येथे हिट अँड रनचा प्रकार समोर आला आहे. भरधाव चारचाकीने दुचाकीस्वारास धडक दिली आहे.

धक्कादायक म्हणजे त्यानंतर त्याने दुचाकीस्वारास फरफटत नेले आहे. ही घटना बुधवारी दुपारी चार वाजता घडली आहे.

सदर घटनेचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये कार चालक टूव्हिलरला फरफटत नेत असल्याचं दिसून येत आहे. चारचाकीचा चालक हा मद्यधुंद असल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शीनी केला आहे.घटनेच्या थरार समोर आला असून व्हिडिओ अंगावर काटा आणणार आहे.

अपघातानंतर आरोपी चालक पळून गेला आहे. सदर घटनेमध्ये दूचाकीस्वार चालक गंभीर जखमी झाला आहे. त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. आरोपीचा शोध सुरु आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

राज्यात हिट अँड रनचे नवनवे प्रकरणे समोर येत आहे. पुण्यातील कल्याणी नगरमधील घटनेने या सर्व अपघातांकडे गांभीर्याने पाहिलं जाऊ लागलं आहे. कल्याणीनगरमध्ये एका अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेमध्ये दोन तरुणांना चिरडले होते. यात दोघांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मुंबईच्या वरळीमध्ये एका राजकीय नेत्याच्या मुलाने एका महिलेला फरफटत नेले होते. यात महिलेचा मृत्यू झाला होता.

पुणे, मुंबई आणि राज्यातील इतर काही शहरांमध्ये अशाप्रकारच्या घटना समोर आल्या आहेत. अनेक घटनांमध्ये चालक मद्य पिऊन गाडी चालवत असल्याने अपघात घडले आहेत. याशिवाय अपघातानंतर आरोपी चालक पळून देखील गेले आहेत. त्यामुळे अशा प्रकरणामध्ये दोषी असलेल्या चालकांना कठोर शिक्षा व्हावी अशी सर्वसामान्य लोकांची मागणी आहे. अशा प्रकरणामध्ये आरोपी चालक किरकोळ शिक्षेनंतर सुटत असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे लोकांमध्ये रोष आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close