एस ओ एस कब्स व प्रायमरी येथे “शिक्षक दिन” मोठ्या उत्साहाने साजरा
धामणगाव रेल्वे /प्रतिनिधी
श्री दत्ताजी मेघे बाल कल्याण शिक्षण संस्था द्वारा संचालित स्कूल ऑफ स्कॉलर्स कब्स व प्रायमरी मध्ये भारताचे दुसरे पंतप्रधान डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन याच्या जन्मदिनाचे औचित्य साधून “शिक्षक दिन “मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती माता व डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजनाने करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका के साई नीरजा होत्या. शिक्षक दिनाच्या निमित्ताने ब्लू हाऊस तर्फे विशेष परिपाठाचे आयोजन करण्यात आले . शिक्षक दिनाची निमित्ताने, विद्यार्थाने शिक्षकाचे महत्त्व स्पष्ट केले आणि शिक्षकांबद्दल आदर व्यक्त केला. सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका साकारली विद्यार्थ्यांना वर्गात शिकविले व स्वयंशासनाचा आनंद घेतला. संगीत शिक्षक गौरव देवघरे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सुंदर असे शिक्षकांवर आधारित गीत सादर केले. विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका याविषयावर आपले विचार व्यक्त केले. प्रणिता जोशी यांनी शिक्षक दिनाबद्दल सर्व विद्यार्थ्यांना माहिती दिली. सर्व विद्यार्थी परिषद सदस्य यांनी शिक्षकांसाठी विविध प्रकारच्या मनोरंजक खेळाचे आयोजन केले होते. शाळेच्या मुख्याध्यापिका के. साई नीरजा आणि पर्यवेक्षिका शबाना खान यांच्या हस्ते शिक्षकांचे ग्रीटिंग कार्ड्स आणि भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. आर्गेनाईजेशन कमिटी प्रमुख नितीन श्रीवास, प्रदीप मांडवकर, मयुरी लांजेवार , सर्व विद्यार्थी परिषद सदस्य , ब्ल्यू हाऊस आणि शाळेच्या मुख्याद्यापिका के साई नीरजा यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोफिया खान सहर्ष विश्वनाधा व हितार्थ चिंचे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांनी अथक प्रयत्न केले आणि हा कार्यक्रम यशस्वी केला.