दोन वेगवेगळ्या घटनेत दुय्यम निबंधक आणि हवालदार एसीबी च्या जाळ्यात

कल्याण / नवप्रहार वृत्तसेवा
शासकीय कर्मचारी त्यांना असलेल्या पगारामुळे ढेर पोटे झाले आहेत .असे असतांना सुद्धा वरकामाई चा मोह काही सुटत नाही. या वरकमाईच्या लालचेपायी दोन शासकीय कर्मी एसीबी च्या जाळ्यात अडकले आहेत. त्यात एक सहा दुय्यम निबंधक (कल्याण ) आणि दुसरा नागपूर येथील हुडकेश्वर ठाण्याचा हवालदार आहे.
घराचे रजिस्ट्रेशन करून देण्यासाठी कल्याण पूर्वेकडील सहाय्यक दुय्यम निबंधकाच्या पैशांची ) मागणी केली. ठरलेली रक्कम स्वीकारताना सहाय्यक दुय्यम निबंधकाला ठाणे अँटी करप्शन ब्युरोच्या पथकाने रंगेहाथ अटक केली.
या अधिकाऱ्याला ताब्यात घेत तपस सुरु करण्यात आला आहे. कल्याण पूर्वेकडील असलेल्या कार्यालयातील राज कोळी असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. संबंधित तक्रारदाराने घर घेतल्याने घराचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी राज कोळी यांनी तक्रारदाराकडे २४ हजार रुपयांची मागणी केली होती. मात्र इतकी रक्कम देणे शक्य नसल्याने तडजोडअंती बारा हजार रुपये देण्याचे निश्चित झाले होते. मात्र तक्रारदाराने याबाबत ठाणे एसीबीकडे (ACB) याबाबत तक्रार दिली होती. याची पथकाने पडताळणी करत सापळा रचला.
अधिकाऱ्यासह अन्य एक ताब्यात
ठरल्यानुसार तक्रारदार आज सकाळच्या सुमारास कल्याण पूर्वेकडील सहदुय्यम निबंधक कार्यालयात आले. यावेळी राज कोळी यांनी तक्रारदाराकडून १२ हजार स्वीकारताना ताब्यात घेतले आहे. ठाणे अँटी करप्शन ब्युरोने सापळा रचत ही कारवाई केली आहे. राज कोळी यांच्यासोबत एका खाजगी इसमाला देखील ठाणे अँटी करप्शन ब्युरोने ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू केला आहे.
तर दुसरी घटना नागपूर येथील आहे. पासपोर्ट नूतनीकरणाच्या पडताळणीसाठी दोन हजारांची लाच मागणे हुडकेश्वर पोलीस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांना चांगलेच भोवले. ते लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या सापळ्यात अडकले व त्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.
राहुल दत्तात्रय महाकुळकर (पोलीस हवालदार) व नितीन पुरुषोत्तम ढबाले (पोलीस शिपाई) अशी कारवाई करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. एका व्यक्तीने पासपोर्ट नूतनीकरणासाठी अर्ज केला होता. पासपोर्ट कार्यालयाकडून पडताळणीसाठी अर्ज हुडकेश्वर पोलीस ठाण्यात आला. पडताळणीच्या सकारात्मक अहवालासाठी दोन्ही आरोपींनी समोरील व्यक्तीला दोन हजारांची लाच मागितली. त्यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने समोरील व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
विभागातील पथकाने प्राथमिक चौकशी केली व तक्रारीत तथ्य असल्याची बाब समोर आली. त्यानंतर सापळा रचण्यात आला व बुधवारी २ हजारांची लाच स्वीकारताना नितीन ढबालेला पकडण्यात आले. त्याची चौकशी केली असता राहुल महाकुळकरच्या सांगण्यावरून लाच घेतल्याची त्याने कबुली दिली. एसीबीच्या पथकाने त्यालादेखील ताब्यात घेतले. या कारवाईमुळे पोलीस वर्तुळात खळबळ उडाली. दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक वर्षा मते, आशीष चौधरी, अनिल बहिरे, आशू श्रीरामे, अमोल मेंघरे, असलेंद्र शुक्ला यांच्या पथकाने ही कारवाई केली.