दिव्यांगाचा,माण्यवराचा जाहीर सत्कार, वाद विविद स्पर्धेचे बक्षीस वितरण

नेर :- नवनाथ दरोई
नेर येथील निर्मल बन्सी लाॅन येथे 26 जानेवारी गणराज्य दिनाचे औचित्य साधून, गेल्या 23 वर्षापासून लोकानुकंपाय बहुउद्देशीय संस्था व येत्या काही वर्षापासून पाॅवर ऑफ मीडिया यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांगणाचा व मान्यवरांच्या जाहीर सत्कार व स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नेहरु महाविद्यालयातील माजी प्राचार्य डॉ. प्रवीण बनसोड हे मंच्यावर विराजमान होते. उद्घाटन गणपती मठ संस्थांचे अध्यक्ष राजेंद्र चिरडे,प्रमुख पाहुणे शिवसेना तालुकाप्रमुख मनोज नाल्हे, पावर ऑफ मीडियाचे वकील दानिश, वाद-विवाद पटू आशिष कांबळे, वैशाली मासाळ, अर्चना ईसाळकर, संगीता पवार, प्रमोदिनी मुंदाने, प्रतिभा पवार, दुर्गा पटेल, व अध्यक्षाच्या शुभहस्ते पाहुण्यांच्या उपस्थितीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, कर्मयोगी गाडगेबाबा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन, पुष्पामाला अर्पण दीप प्रज्वलीत करून उद्घाटन करण्यात आले.वाद विवाद स्पर्धेचे प्रथम बक्षिस 5001 रुपये रोख अमरावती येथील सौरभ गुडधे, द्वितीय बक्षीस 4001 रुपया रोख नागपूर येथील अनिरुद्ध तळेगावकर,तृतीय बक्षीस पुणे येथील येश चव्हाण,250१ रुपये रोख चतुर्थ बक्षीस 2101 रुपये रोख पुसद येथील अक्षय सुरोशे, पंचम बक्षीस 2001 रुपये रोख नागपूर येथील प्रणय देवते यांनी पटकावले, प्रोत्साहनपर 1001 रुपये रोख, पार्थ चिरडे, योगिता कुऱ्हाडे, तन्वी राखडे,अनंत जोल्हे,सरोज खान यांनी पटकावले या स्पर्धेतील विजेत्यांना एड. सलीम शाहा यांच्या कडून विजेते स्पर्धकांना शिल्ड देण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण प्रा.ए. झेड.खान, संजय यवतकर, एड. रश्मी पेटकर यांनी केले. दिव्यांगन संदिप कोल्हे,दत्ता गव्हाने,पिंटू ढबाले, माण्यवर दिवाकर ढोके,वंदना ढोके,शोभा कोठारी, विना खोडवे,प्रशांत झोपाटे,ह.भ.प.प्रकाश महाराज, योगेश दहेकर,राजू देऊळकर यांना शाल, गुच्छ,शिल्ड देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी करीता पाॅवर आॅफ मिडियाचे नेर तालुका अध्यक्ष नवनाथ दरोई,संदेश बांबोडे, संक्षम दरोई, तुशार तोराम,रोहित आडोळे,सम्यक शेडें, भुमिका दरोई,प्रगती तायडे यांनी अथक परिश्रम घेतले. प्रास्ताविक बापूराव रंगारी,सुत्रसंचालन हर्षवर्धन तायडे यांनी केले.