क्राइम

वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलेची हत्या 

Spread the love

पुणे / नवप्रहार ब्युरो 

                         पुण्यात एक धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. येथे बुधवार पेठ.परिसरात देहव्यापार करणाऱ्या महिलेची हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी रिक्षाचालक असलेल्या , नितीन चंद्रकांत पंडित (वय ५१, रा.सिंहगड रस्ता, पुणे) याला अटक केली आहे.

मृत महिलेचे नाव श्यामली (वय ४०, रा. धायरी, रायकर मळा) असे आहे. ही घटना शनिवारी घडली असून, नांदेड सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हत्येची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. यानंतर तपास करत आरोपी नितीन पंडितला अटक करण्यात आली.

पोलिसांच्या चौकशीत समोर आले आहे की, मृत श्यामली आणि आरोपी नितीन यांची पूर्वीपासून ओळख होती. श्यामली दररोज रात्री बुधवार पेठेत वेश्याव्यवसाय करण्यासाठी जात असे आणि नितीन हा रिक्षा चालक असून तो तिला तिथे सोडण्याचे व परत आणण्याचे काम करत होता. यातून दोघांमध्ये मैत्रीचे संबंध निर्माण झाले होते.

ओळखीमुळे श्यामलीने नितीनकडून सुमारे ४० ते ५० हजार रुपये घेतले होते. नितीन वारंवार पैशांची मागणी केल्यानंतरही श्यामली पैसे परत करत नव्हती. घटनेच्या दिवशीही पैशांच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, रागाच्या भरात नितीनने श्यामलीचा ओढणीने गळा आवळून खून केला. नांदेड सीटी पोलिसांनी आरोपी केली असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close