मानवतेचे प्रचारक या राज्यस्तरीय काव्य पुरस्कारासाठी प्रस्ताव आमंत्रित
आर्वी / प्रतिनिधी
सर्व कवी मित्रांना कळविण्यात आनंद होत आहे की मानवतेचे प्रचारक या राज्यस्तरीय काव्य पुरस्कारासाठी प्रस्ताव आमंत्रित असून जानेवारी 2023 ते जुन 2024 पर्यंत प्रकाशित काव्य संग्रहांना मानवतेचे प्रचारक या राज्यस्तरीय काव्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे पुरस्कारासाठी कवितासंग्रहाच्या दोन प्रती व फोटो सहित संपूर्ण परिचय खाली दिलेल्या पत्त्यावर आपण पाठवावे ही नम्र विनंती पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह सन्मानपत्र, भारतीय संविधान प्रत, शाल पुष्पगुच्छ पुस्तक प्रकाशन सोहळ्याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात येईल. तसेच सामाजिक कार्य व धम्माचा प्रचार व प्रसार करणाऱ्या प्रचारकांना सुद्धा मानवतेचे प्रचारक हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येईल. तसेच सोशल मीडिया क्रिएटर व
रील स्टार यांना सुद्धा हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे
दिनांक 30 ऑक्टोंबर 2024 पर्यंत आपण प्रस्ताव सादर करावे ही नम्र विनंती
मानवतेचे प्रचारक राज्यस्तरीय काव्य पुरस्कार
*सुरेश किसनराव भिवगडे*
*बुद्ध विहार परिसर*
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर आर्वी तह -आर्वी जिल्हा वर्धा 442201*
*Mob 8308913115*