सामाजिक

नवरा गेला बाहेरगावी ; वहिनीने केले दिरासोबत लग्न 

Spread the love

पाटणा / नवप्रहार डेस्क 

                 पती व्यतिरिक्त कुटुंबातील इतर लोकांशी महिलेचे प्रेमसंबंध ही काही नवीन बाब राहिलेली नाही. पती घरी नसतांना किंवा कामानिमित्ताने बाहेर गावी गेल्यावर अश्या अवैध संबंधाला चांगलाच बहर येतो. आणि मग पेमात पडलेले असे लोक असा काही निर्णय घेतात की सगळ्यांनाच आश्चर्य होतो. अशीच घटना पाटणा येथे घडली आहे.

           मंदिरात एका जोडप्याने एकमेकांना पुष्पहार घातला तेव्हा उत्सुकतेपोटी लोकांनी एकच गर्दी केली. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या सामान्य गोष्टीसाठी एवढी गर्दी का झाली?तर यामागचं कारण वेगळंच आहे. सुरुवातीला लोकांना वाटलं, की हे एक सामान्य लग्न आहे आणि हे जोडपं लग्न करत असल्याचं पाहून त्यांना आनंद झाला. परंतु जेव्हा कळलं की हे दोघं वहिनी आणि दीर आहेत, तेव्हा हे लग्न चर्चेचा विषय बनलं.

बिहारमधील सिवान जिल्ह्यातील महाराजगंज येथील ही घटना आहे. महाराजगंजच्या प्रसिद्ध जरती माँ मंदिरात दोघांनी हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न केलं. नात्याने हे दोघं एकमेकांचे दीर आणि वहिनी आहेत. देवी मातेला साक्षी मानून दोघांनीही एकमेकांना पुष्पहार घातला, यानंतर दिराने वहिनीला सिंदूर लावून तिच्याशी लग्न केलं. हा विवाह पाहण्यासाठी लोकांची एकच गर्दी जमली आणि एकच चर्चा सुरू झाली.

महाराजगंज पोलीस स्टेशन हद्दीतील पोखरा मठिया गावात राहणारे नंद किशोर महतो याचं लग्न 2018 मध्ये गोपालगंज पोलीस स्टेशन हद्दीतील बरौली पोलीस ठाण्याच्या बरहेदा गावातील संगीतासोबत झालं होतं. दरम्यान, संगीता हिने एक मुलगा आणि एका मुलीला जन्म दिला. नंद किशोर पैसे कमावण्यासाठी दुसऱ्या राज्यात गेला. दरम्यान, संगीता आपला चुलत दीर कृष्णा याच्या प्रेमात पडली.

दोघांचं प्रेम इतकं फुललं की दोघांनी एकत्र जगण्याची आणि मरण्याची शपथ घेतली. दरम्यान, हे प्रकरण पोलीस ठाण्यातही गेलं, तिथे कुटुंबीयांमध्ये सामंजस्य होऊन दोघांनीही जरती माँ मंदिरासमोर लग्न केलं, ही बाब परिसरात चर्चेचा विषय बनली आहे. दोघांनीही कॅमेऱ्यासमोर लग्नाचा स्वीकार केला.

What’s your Reaction?
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close