आपले साहित्य विकून केला शासन प्रशासनाचा निषेध
(बाळा जगताप यांच्या नेतृत्वात गवंडी कामगार व घरकुल लाभार्थी यांचे सामान बेचो आंदोलन)
आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले
आर्वी :- घरकुल धारकांना एक ते दीड महिन्यांपासून रेती मिळत नसल्याने परिणामी गवंडी कामगार बेरोजगार झाले आहे त्यांच्या हाताला काम नाही. याला जबाबदार शासनाचे धोरण आहे. कारण गेल्या एक ते दीड महिन्यापासून घरकुल लाभार्थ्यांनी रेती करिता नंबर लावून ठेवले मात्र डेपो उपलब्ध नाही त्यामुळे रेती उपलब्ध नाही. तसेच येनाती रेती ही मध्य प्रदेश मधून येत असल्याने व रेतीचा एक ट्रक जवळपास ६०,००० रुपयांचा असल्याने एका सामान्य नागरिकांची एक ट्रक रेती घेण्याची क्षमता नाही. जर समजा त्या नागरिकांनी चार ते पाच लाभार्थी मिळून एक ट्रक बोलावला तरी ती वाटप करण्याकरिता ट्रॅक्टर ची गरज आहे आणि त्याकरिता प्रशासनाची परवानगी हवी आहे. जर परवानगी नसली तर कुणीही आपल्या ट्रॅक्टर लावून ती रेती लाभार्थ्यांच्या घरापर्यंत पोहचवत नाही. त्यामुळे त्या परवानग्या देण्यात यावा याकरिता आज प्रहार सोशल फोरम चे संस्थापक अध्यक्ष बाळाभाऊ जगताप यांच्या नेतृत्वात “सामान बेचो आंदोलन” करण्यात आले. यामध्ये गवंडी कामाकरीता आवश्यक असणारे सामान जसे टोपले, फावडे, कुदळ, कौचा इत्यादी साहित्य विकून प्रतीकात्मक आंदोलन करण्यात आले. त्यातून आलेले पैसे उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत शासनाला पाठवणार असल्याचे बाळा जगताप यांनी सांगितले.
शासनाने जर येत्या चार ते पाच दिवसात निर्णय न घेतल्यास उपविभागीय अधिकारी कार्यालय समोर दररोज एक तास दुपारी ११ ते १२ “घंटानाद आंदोलन” करण्यात येईल असा इशारा बाळा जगताप यांनी गवंडी कामगार व घरकुल लाभार्थी यांच्या उपस्थितीत प्रशासनाला दिला