अतिवृष्टीमूळे घाटंजी तालुक्यातील जनजीवन विस्कळित.
अनेक गावांची पुरामुळे बिकट परिस्थिती

घाटंजी तालुका प्रतिनिधी / सचिन कर्णेवार
गेल्या दोन ते ३ दिवसांपासून सतत सुरु असणा-या पावसामुळे घाटंजी तालुक्यातील जनजीवन विस्कळित झाले आहे. शासनाने आधीच रेड अलर्ट मधे दाखविलेला यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील बहूसंख्य गावाला वरून राज्याची अवकृपा व वाढते जलस्त्रोत याचे रोद्ररुप पाहावे लागले.सगळीकडे पाणी काल रात्रभर सारखा सुरू असल्यामूळे रात्रीला झोपे गेलेल्यां नदीकाटच्या वस्तीला सकाळी सकाळही पाण्याच्या रौद्र रूपाने पहावी लागली. पाण्याची पातळी यंदा एवढी वाढली की,अनेक गावचा पुरामूळे तालूक्यासी संपर्क तूटला .मुर्ली,पारवा,येळाबारा,पांढर्णा, मांडवा,चोरांबा यासारखी गावची चहूबाजूने रसत्या वरची पुले जलमय झाल्याणी वाताहत ठप्प झाली.विशेष करून यंदा पाण्याचा स्तर एवढा होता की,मुर्ली या गवातील मध्यभागी असलेल्या विठ्ठल मंदीरातही पाणी शिरले. याच गावातील एक मयत ईसम झाले त्या घरीही पाणी शिरले होते. घाटंजीतील वाघाडी नदीने पुन्हा आपले रौद्ररुप दाखवू न २०१९ ची पुणर्आवृत्ती करत नेहरू नगर खालचा भाग,वडार मोहला,आंबेडकर वार्ड,कुंभार पुरा व इतरही वस्ती भागात पाणी शिरून अनेक घरांना ईतर स्थलांतरित करण्यात आले.जिवनावशक वस्तू सोबत घराचेही नुकसान झाले. शहरातील पुर परिस्थिती भागात एसडीओ यासनी नटराजन व न.प. मुख्याधिकारी अमोल माडकर यांनी तात्काळ भेटी दिल्या सोबतच त्वरित उपाययोजना करण्यात येऊन पुरग्रस्तांना स्थलांतरित करून जलाराम मंदिर येथे तात्पुरती व्यवस्था करण्यात आली.
यंदा पावसाने एवढे झोडपले की,काही नदीकाठच्या घरांची शासनाची उज्वला योजनेतून मिळालेली सिलेंडरही वाहून गेली. पुरामुळे घरात पाणी शिरलेमूळे काहीं वृध्द व बिमार व्यग्तीला अक्षरशा कडीवर नेण्याची वेळ आली त्यावेळी जनतेतून शासनाच्या काही अधिकारी वर्गास संकटकाळी देण्यात येणा-या पोकळ आश्वासनांच्या रोशालाही सामोरं जावे लागले.आता पुल जरी ओसरत असला तरी,येत्या पावसाळी दिवसांत पाणी पाहता शासनाने आधीच त्वरित उपाययोजना करून नदीकाठच्या गाव व वस्तीला सतर्क करत उपाययोजना राबविल्या जाव्यात ही मागणी जनतेतून व पुरग्रस्तांतून होत आहे.