राजकिय

प्रा.अनिल राठोड यांना वंचित आघाडी सह अनेक संघटनांचा पाठिंबा

Spread the love

यवतमाळ  / प्रतिनिधी
वंचित बहुजन आघाडी यवतमाळ तर्फे समनक जनता पार्टीचे लोकसभा उमेदवार डॉ. प्रा.अनिल राठोड यांना जाहीर पाठिंबा दिला तसेच बंजारा गौरसेनेचे अध्यक्ष संदेश चव्हाण यांनी सुद्धा आपला पाठिंबा जाहीर केला आहे. ही घोषणा आज सेलिब्रेशन हॉल येथे पत्रकार परिषदेमध्ये वंचित उमेदवार अभिजीत राठोड यांनी पत्रकारांना माहिती दिली.
सविस्तर वृत्त असे की वंचित बहुजन आघाडी चे उमेदवार यवतमाळ वाशिम लोकसभा निवडणुकीतून त्यांची उमेदवारी रद्द झाली.वंचित बहुजन आघाडीने प्रथमता सुभाष पवार यांना उमेदवारी दिली होती मात्र सुभाष पवार यांच्या तब्येतीमुळे व डॉक्टरांनी दिलेल्या सल्या आधारावरती त्यांनी ही उमेदवारी मागे घेतली त्यानंतर अभिजीत राठोड या सक्रिय कार्यकर्त्याला बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी तर्फे यवतमाळ वाशिम १४ लोकसभा उमेदवारी घोषित केली. त्यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करून घोषणापत्र व इतर प्रक्रिया केली. मात्र त्यांचा उमेदवारी अर्ज काही त्रुटीमुळे नाकारण्यात आला त्यामुळे वंचित कडून एकही उमेदवार या लोकसभेमध्ये नसल्याने वंचित बहुजन आघाडीचे मतदान आता कोणाला जाणार याकडे जनतेचे लक्ष लागले होते. निवडणुकीचे वातावरण तापले असून अवघ्या तीन चार दिवसा वरती निवडणूक येऊन ठेपली असताना वंचित ने समनक जनता पार्टीला आपला पाठिंबा देऊन वंचित,मुस्लिम,दुर्बल समाजातील शोषित पीडित आणि सत्तेपासून वंचित असलेल्या वर्ग समूहाला राजकीय प्रवाहात सामील करण्यासाठी व बाळासाहेबांची चळवळ गतिमान करण्या करीता वंचित बहुजन आघाडीने प्रा.डॉ.अनिल जयराम राठोड यांना जाहीर पाठिंबा घोषित केला आहे.
तसेच बंजारा गोरसेनेची ताकद सुद्धा या उमेदवाराला मिळाल्याने बंजारा समाजातील सर्व तांडे पिंजून काढणार. तसंच मोठा जनसमुदाय सुद्धा आपल्या पाठीशी असून मुस्लिम समुदाय या दोन्ही शिवसैनिकांना मतदान करणार नाही बाबरी मज्जिद पाडण्याचे षडयंत्र करणाऱ्यांना मुस्लिम मतदान करणार नाही. मुस्लिम दलितांचे एकटा मतदान आम्हालाच मिळणार अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली .

माझा लढा धनशक्तीच्या विरोधात.– प्रा.डॉ.अनिल राठोड

देशात व राज्यात राजकारण सुरू आहे.
पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा मिळवण्याचे काम आत्ताचे राजकीय सत्ताधारी पक्ष करीत आहे तसेच संविधान धोक्यात आहे. महागाई आरक्षण, शिक्षणाचे खाजगीकरण आताची सरकार ही टाटा बिर्ला अंबानी यांच्या करीतच लढा लढताना दिसत आहे ज्यांनी मते दिली त्यांच्यासाठी कुठल्याही उपाय योजना या सरकारकडे नाही भारत देश हा कृषिप्रधान देश असून शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही त्यांना गुलाम बनवल्या जात आहे शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडून टाकण्याचे काम हे सरकार करीत आहे. तसेच काँग्रेस सुद्धा या मुद्द्याला मोठ्या प्रमाणात उचलले नाही. त्यांनी सुद्धा शेतकऱ्याच्या बाजूने आपली ठोस भूमिका मांडली नाही. शेतकऱ्यांना कळत नकळत त्यांची शेती हे विकले जावे पासून टाटा बिर्लांबांनी या शेती विकत घेतील अशी व्यवस्था या सरकारने करून ठेवलेली आहे. त्यामुळे माझा लढा हा धनशक्तीच्या विरोधात आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close