आदिवासी स्मशान भूमीची समस्या समाजसेवी मुकूंदराव देशमुखांनी निकाली काढली; वृक्षारोपणाने पुण्यतिथी सोहळा संपन्न
अमरावती (प्रतिनिधी) ः अमरावती तालुक्यातील पुजदा येथे आदिवासी समाज बांधव यांच्यातील अंत्यविधीसाठी अधिकृत स्मशानभूमीची समस्या धूळ खात पडली होती. स्थानिक ग्रामपंचायत व शासन प्रशासनाकडे मागणी करूनही प्रतिसाद मिळत नव्हता. आदिवासी बांधवांना उघड्यावर सोपस्कार पार पाडावे लागत होते. पुजदा येथील सामाजिक कार्यकर्ते मुकूंदराव उर्फ अण्णासाहेब देशमुख यांना समाज बांधवांनी स्मशान भूमीसाठी अधिकृत जागा उपलब्ध करून द्यावी यासाठी तगादा लावला. समाजभान राखून अण्णासाहेब देशमुख यांनी ग्राम पंचायतला पाठपुरावा करण्याच्या सूचना देऊन स्वतः पुढकार घेऊन शासन स्तरावर कागदोपत्री पाठपुरावा केला. ग्रामपंचायतवर देशमुख पॅनलची सत्ता आहे. देशमुख यांच्या प्रयत्नांना यश प्राप्त होऊन शासनाची एक एक्कर ‘ई क्लासची’ जागा उपलब्ध झाली.
समाज बांधवानीं लक्ष्मण महाराज पवार यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून पुण्यतिथी सोहळा आयोजित करून आपला आनंद व्यक्त केला. या शुभ कार्याची सुरूवात वृक्षारोपणाने करून आभार प्रगट करण्यास प्रमुख अतिथी अण्णासाहेब देशमुख तसेच सरपंच उज्वल दळवी, उपसरपंच अरूण शिंदे यांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली. पुजदा गावात पारधी समाजाचे पवार कुटुंब मोठ्या संख्येने आहे. याच पवार कुटुंबात ‘लक्ष्मण पवार’ नावाचे साधेसुधे ब्रम्हचारी अवलिया स्वभावाचे गृहस्थ जन्माला आले होते. त्यांची समाजाप्रती बांधिलकी व योगदान पवार कुटुंबासाठी आदर्शवत होती. त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी पुण्यतिथी साजरी करण्यात येते. दि. 14 जानेवारीला पुण्यतिथीचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी आदिवासी समाजाचे कार्यकर्ते प्रा. चरणदास सोळंके, प्रमुख अतिथी मानवाधिकार कार्यकर्ते तथा पत्रकार रमेख खोडे, संजयराव जुनघरे माजी उपसरपंच रामा (साऊर) यांची उपस्थिती होती. स्मशानभूमीचे सौंदर्यीकरण व देखभाल ग्रामपंचायत करेल. तेथे नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न ग्राम पंचायत करेल असे आश्वासन सरपंच उज्वल दळवी यांनी आपल्या मार्गदर्शनातून दिले. प्रल्हादराव पवार सर्व समाज बांधव संजय पवार, नंदू प्रल्हाद पवार, रामेश्वर सुपवार माजी सभापती पंस अमरावती, किशोर स . पवार , संदिप पवार, सत्यपाल पवार, बंडू पवार, शाम पवार सही सर्व पवार परिवार यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यास पुढाकार घेतला. आभार प्रदर्शन शिक्षक नंदकिशोर पवार यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता सुरूची भोजनाने झाली.
प्रदेश उपाध्यक्ष
मो. 8554068210