क्राइम

प्रियकराच्या मृतदेहाचे तीन तुकडे करून मैत्रिणीच्या घरी गाडले

Spread the love

प्रतापगढ (युपी )/ नवप्रहार डेस्क

                      कंपनीत काम करणाऱ्या एका महिलेचे बिहारच्या पुरुषासोबत प्रेमसंबंध  जुळले. पण काही दिवसातच ती त्याला कंटाळली. पण तो तिला सोडायला तयार नव्हता. शेवटी तिने ही बाब नवऱ्याला सांगितली. मग त्यांनी एक प्लान आखला. त्यांत तिने तिच्या मैत्रिणीला आणि मैत्रिणीच्या नवऱ्याला शामिल करून घेतले. बिहार निवासी त्या व्यक्तीची काही खबर न मिळाल्याने त्याच्या घरच्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. त्या नंतर प्रकरणाचा छडा लागला.

बिहार पोलिसांनी चौकशी सुरु केल्यानंतर हादरवून टाकणार हत्याकांड समोर आलं. उत्तर प्रदेशच्या प्रतापगढमधील हे प्रकरण आहे. फतनपुर पोलीस ठाणे क्षेत्रातील सुवंसा गावच हे प्रकरण आहे. या गावात राहणारे विनोद आणि त्याची पत्नी पुष्पा हरियाणा गुरुग्राम येथील एका प्रायवेट कंपनीत काम करते.

पुष्पाच बिहारच्या शिवनाथसोबत (45) प्रेम प्रकरण सुरु झालं. पण लवकरच ती शिवनाथला कंटाळली. शिवनाथपासून तिला सुटका हवी होती. पण शिवनाथ हे नातं संपवायला तयार नव्हता. महिलेने त्यानंतर नवरा विनोदला सर्व सांगितलं. त्यानंतर नवरा-बायको दोघांनी मिळून प्लान बनवला. एक महिन्यापूर्वी पुष्पा कंपनीतून सुट्टी घेऊन आपल्या मूळगाव सुवंसा येथे आली.

तिने प्रियकर शिवनाथला गावी बोलवून घेतलं. प्रेयसीने बोलवल्यानंतर शिवनाथ लगेच तयार झाला. पण त्याला हे माहित नव्हतं की, त्याच्यासोबत पुढे काय होणार आहे. पुष्पाने मैत्रीण पूनमला सुद्धा घरी बोलावलं. तिथे आधीपासून पुष्पाचा नवरा, पूनम आणि तिचा नवरा चिंतामणी हजर होते. शिवनाथ पुष्पाच्या घरी येताच त्याची गळा घोटून हत्या केली. मृतदेहाचे धारदार हत्याराने तीन तुकडे केले व पूनमच्या घरातच मृतदेहाच दफन केलं.

त्यानंतर विनोद आणि पुष्पा गुरुग्रामला निघून गेले. बिहार पोलीस शिवनाथचा शोध घेत होती. तो पुष्पाच्या नियमित संपर्कात असल्याच पोलिसांना समजलं. शेवटच बोलण सुद्धा तिच्याशीच झालं होतं. त्यानंतर पोलिसांनी पुष्पाला ताब्यात घेऊन तिची चौकशी सुरु केली. पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच पुष्पा भळाभळा सर्व बोलून गेली. अशा प्रकारे भयानक हत्याकांडाची उकल झाली.

What’s your Reaction?
+1
0
+1
1
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close