क्राइम

प्रियकराची हत्या करून मृतदेहाचे ३०० तुकडे 

Spread the love

              काही घटना अशा असतात ज्या आयुष्यभर स्मरणात राहतात. २००८ साली घडलेल्या एका घटनेने संपूर्ण देश हादरून गेला होता. आजही त्या घटनेची आठवण झाली की अंगावर शहारे उभे राहतात. चला तर जाणून घेऊ या काय होती घटना.

 २००८ साली मुंबईत  घडलेल्या एका हत्याकांडाने संपूर्ण देशाला हादरवून सोडले होते. एका कन्नड अभिनेत्रीने, तिच्या नौदल  अधिकारी प्रियकराच्या मदतीने, मित्राची निर्घृण हत्या केली.

केवळ हत्याच नव्हे, तर मृतदेहाचे ३०० तुकडे करून जाळण्यात आले. या प्रकारणाने संपूर्ण मुंबईला हादरवून सोडलं होतं.

मारिया सुसाईराज  ही कन्नड  अभिनेत्री बॉलिवूडमध्ये नशीब आजमावण्यासाठी मुंबईत  आली होती. येथे तिची ओळख नीरज ग्रोव्हर  या तरुणाशी झाली, जो एका मोठ्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये कार्यरत होता. दोघांमध्ये मैत्री वाढली, पण मारियाचे  नौदल  अधिकारी एमिल जेरोम मॅथ्यू  याच्याशी प्रेमसंबंध होते.

मारिया  आणि नीरजच्या  वाढत्या जवळीकीचा जेरोमला  संशय आला. एका दिवशी तो अचानक मुंबईतील  मारियाच्या  घरी पोहोचला, तेव्हा त्याला नीरज  तिच्या बेडरूममध्ये आढळला. यातून झालेल्या वादावादीत संतापाच्या भरात जेरोमने नीरजवर   चाकूने वार करून त्याची हत्या केली.

हत्येनंतर मारिया  आणि जेरोमने  नीरजचा  मृतदेह घरातच ठेवला आणि धक्कादायक म्हणजे, त्या मृतदेहाजवळच त्यांनी अनेकदा शारीरिक संबंध ठेवल्याचे समोर आले. त्यानंतर त्यांनी मृतदेहाचे सुमारे ३०० तुकडे केले, ते प्लास्टिक पिशव्यांमध्ये भरले आणि मुंबईच्या  उपनगरातील जंगलात नेऊन पेट्रोलने जाळून टाकले.

नीरज  बेपत्ता झाल्याने त्याच्या मित्र-कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दिली. एका चुकीच्या फोन कॉलमुळे पोलिसांचा संशय मारिया  आणि जेरोमवर गेला. चौकशीदरम्यान मारियाने गुन्ह्याची कबुली दिली. न्यायालयाने नंतर मारियाला  ३ वर्षे आणि जेरोमला  १० वर्षांची शिक्षा सुनावली, ज्यामुळे मोठी खळबळ उडाली होती.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close