प्रियकराचा लग्नास नकार ; प्रेयसीने घडवली अद्दल

प्रेयसी आणि प्रियकरावर गुन्हा दाखल
रांची (झारखंड)/ नवप्रहार मीडिया
प्रेमात धोका मिळाला की मनुष्य किती संतापतो आणि बदलाच्या भावनेने कसा क्रूर बनतो याचे उदाहरण झारखंड राज्यातील रांची जिल्ह्यातील गिरीडिंह येथे घडलेल्या घटनेवरून समोर आले आहे. येथे प्रेमाचे नाटक करून आणि लग्नाचे आमिष देऊन महिलेचे लैंगिक शोषण करणाऱ्या आणि नंतर लग्नास नकार देणाऱ्या प्रियकराच्या प्रायव्हेट पार्ट वर ब्लेड ने वार करून महिलेने आपल्या कथित प्रियकराला जखमी केले आहे. यानंतर स्वतः ठाण्यात जात आत्मसमर्पण केले आहे. विशेष म्हणजे दोघांचेही लग्न झालेले आहे.
पोलिसांच्या चौकशीत त्या महिलेने कृत्याची कबूली देत सर्व गोष्टी कथन केल्या. सदर महिला विवाहीत आहे, मात्र भांडणामुळे ती पतीसोबत नव्हे तर एकटीच राहते. वर्षभरापूर्वी तिची गावातील सुशील टुडू याच्याशी ओळख झाली व हळूहळू त्यांचे एकमेकांवर प्रेम जडले. सुशीलने लग्नाचे वचन देऊन आपल्यासोबत अनेक वेळा शरीरसंबंध ठेवले, मात्र लग्नासाठी दबाव टाकल्यावर त्याने नकार दिला, असा आरोप त्या महिलेने लावला. यामुळे संतापलेल्या महिलेने सुशील याला धडा शिकवण्याचे ठरवले आणि शरीरसंबंध ठेवण्याच्या बहाण्याने घरी बोलावून त्याच्या प्रायव्हेट पार्टवर थेट वार केला.
या घटनेनंतर आरोपी महिलेने स्वत: गिरिडीहमधील तारातंड पोलीस ठाणे गाठले आणि न्यायाची मागणी केली. तर दुसरीकडे या घटनेत जखमी झालेल्या पीडित तरुणाच्या कुटुंबीयांनीही पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून महिलेची तुरूंगात रवानगी केली. आरोपी महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी पीडित तरुणाविरुद्धही गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला आणि तिचा प्रियकर दोघेही आधीपासूनच विवाहीत आहेत. त्यांना मुलंही आहेत. मात्र पीडित तरूण हा त्याच्या पत्नीपासून लपून-छपून आरोपी महिलेला भेटायला यायचा. तर आरोपी महिलाही पतीपासून वेगळी रहात होती. पीडित तरूणाने तिला लग्नाचे वचन दिले होते मात्र ते पाळले नाही, म्हणूनच रागाच्या भरात तिने हे कृत्य केले. घटनेनंतर महिला स्वत: पोलीस ठाण्यात आली आणि आत्मसमर्पण केले, तिने तिच्या प्रियकराविरोधात तक्रारही दाखल केली असे पोलिसांनी सांगितले. सध्या पोलिस दोन्ही बाजूंनी तपास करत आहेत.पोलिसांनी घटनास्थळ गाठून त्या महिलेच्या जखमी प्रियकराला रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याची प्रकृती अद्याप चिंताजनक असल्याचे समजते.