सुर्जीमध्ये नैसर्गिक चिकित्सा उपचार शिबिराचे आयोजन
अंजनगाव सुर्जी ( प्रतिनिधी)
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद च्या वतीने नैसर्गिक चिकित्सा उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
नैसर्गिक चिकित्सा उपचार शिबिर दिनांक 23 मार्च ते 29 मार्च पर्यंत सुर्जी मधील कासाबाई मढी संस्थान मोठी मढी माळीपुरा सुजी अंजनगाव येथे अतिशय अल्प दरात ॲक्युप्रेशर, सुयोग थेरपी नैसर्गिक उपचार पद्धतीने सर्व रोगाचे उपचार केल्या जाणार असून यामध्ये ब्लडप्रेशर, सायटिका आजार ,गॅस कब्ज, दमा श्वास, थायरॉईड, लकवा, गुडघेदुखी, कंबर, मान, मणक्याचे आजार पोटाचे विकार स्थूलपणा, शुगर मायग्रेन डोके दुखणे, डोळे नाक कान, झोप न येणे सांधे दुखणे, घशाचे आजार, स्लिप डिस्क याबाबत ॲक्युप्रेशर रिसर्च ट्रेनिंग व ट्रीटमेंट संस्था जोधपुर येथील विशेषतज्ञ थेरपिस्ट डॉक्टर टीम द्वारे रोगावर प्रसिद्ध तज्ञ डॉ. एम. आर. जाखड जोधपुर यांच्या मार्गदर्शनात उपचार केले जाणार आहेत. सदर शिबिर 23 मार्च रोजी सकाळी आठ ते बारा ते दुपारी चार ते आठ वाजेपर्यंत दिनांक 29 मार्च 2023 पर्यंत सुरू राहणार असून गरजू रुग्णांनी उपचाराकरिता लाभ घेण्याचे आवाहन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.
यापूर्वी सदर शिबिर अंजनगाव सुजी येथील बालाजी मंदिरात आयोजित करण्यात आले होते. सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी असोसिएशनचे ब्रिजमोहनजी झंवर यांनी आयोजित केले होते. सदर शिबिराला या भागात चांगला प्रतिसाद मिळाला.