प्रेमात आला तिसरा केला प्रेयसी चा खात्मा
भिवानी (हरयाणा ) / नवप्रहार मीडिया नेटवर्क
प्रेमात मनुष्याला तिसरा कोणी आलेला जमत नाही. पुरुषाचे ज्या महिलेवर प्रेम असते किंवा ज्या महिले सोबत तो प्रेम करतो ती त्याचीच असावी असे त्याला वाटते. तिचे अन्य कुठे संबंध असल्याचे समजल्यावर तो वेडापिसा होतो .आणि कुठल्याही स्तरावर जाऊ शकतो. भिवानी येथील एका युवकाचे त्याच्या सख्ख्या वहिनी सोबत अवैध संबंध होते. आणि ते मागील चार वर्षांपासून और होते. याची भावाला जराही कल्पना नव्हती. दरम्यान वाहिनेचे अन्य कोणा सोबत अवैध संबंध बनले.ही बाब दिराला समजल्यावर त्याने तिला समजवण्याचा प्रयत्न केला पण ती न मानल्याने शेवटी तिचा खुन केला.
प्रकरण हरियाणातील भिवानी जिल्ह्यातील आहे. पोलिसांनी सांगितलं की, तिगडाणा गावातील तरुणाचे त्याच्याच वहिनीसोबत अवैध संबंध होते . दोघांचे 4 वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याचे सांगण्यात येत आहे. महिलेच्या नवऱ्याला याची अजिबात कल्पनाही नव्हती. दरम्यान, महिलेचे दुसऱ्या एका व्यक्तीसोबतही अवैध संबंध होते. हा प्रकार दीर दीपकला कळताच तो संतापला.दिपकला आपल्या वहिनीसोबत लग्न करायचं होतं आणि तिला बायको बनवायचं होतं. तो याबद्दल तिच्यासोबत बोलणार होता. मात्र त्याआधीच त्याला आपल्या वहिनीचे आणखी एका व्यक्तीसोबत संबंध असल्याचं समजलं. यावरून दोघांमध्ये वारंवार भांडणं होत होती. दिपकने वहिनीला असं न करण्याचा सल्लाही दिला, मात्र तिने ऐकलं नाही.
या वादातूनच महिलेची हत्या झाली. याप्रकरणी महिलेच्या पतीने चुलत भावाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा करताना भिवानीचे एसपी वरुण सिंगला यांनी सांगितलं की, मृत महिलेच्या पतीच्या तक्रारीनंतर तिगराणा येथील रहिवासी दीपक उर्फ छोटू याला अटक करण्यात आली आहे. त्याने सांगितलं की, त्याचे त्याच्या वहिनीसोबत चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते. आपल्या वहिनीचं दुसऱ्यावर प्रेम आहे, असं वाटल्याने त्यांच्यात भांडण झालं आणि या भांडणातूनच त्याने वहिनीचा गळा चिरून खून केला.