प्रेमात अडसर ठरत असलेल्या आपल्या पोटच्या 5 वर्षीय मुलीची महिलेने केली हत्या

लखनौ / नवप्रहार ब्युरो
प्रेमवीरांच्या भावना एकमेकांशी जुळतात आणि त्यांच्यात प्रेमाचा अंकुर फुटतो असे म्हटल्या जाते. पण भावना असणारे हे लोकं क्रूर कृत्य कसे काय करू शकतात ? असा प्रश्न मागील काळात घडलेल्या काही घटनांवरून उपस्थित होत आहे.
प्रेमात लोकं आंधळे होतात हे ऐकले आहे. परंतु इतके आंधळे होतात की स्वतःच्या पतीची इतकेच काय तर ज्या मुलांना त्यांनी जीवाचे रान करून पाळले आहे त्यांची हत्या करण्यातही ते मागेपुढे पाहत नाहीत.
प्रेमात पडलेल्या एका महिलेने आपल्या पाच वर्षीय मुलीची हत्या करून तिचा मृतदेह बॅगेत भरला.आणि स्वतःच मुलीला नवऱ्याने मारून टाकले आहे असा फोन केला. पण पोलिसांनी सत्य काय ते शोधून काढलेच. कृरतेचा.कळस म्हणजे मुलीचा मृतदेह बॅगेत ठेऊन ती प्रियकरासोबत रात्रभर पार्टी करत बसली. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये ही घटना समोर आली आहे. रोशनी खान असे मुलीची हत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे. तिचे उदित जायसवाल याच्यासोबत प्रेमसंबंध आहेत.
लेकीच्या हत्येचा विचार आला अन्
रोशनीचे शाहरुख नावाच्या व्यक्तीसोबत झालेले आहेत. तर उदित यांच्यासोबत विवाहबाह्य संबंध आहेत. उदितसोबतचे संबंध मुलगी पती आणि इतर व्यक्तींना सांगेन अशी भीती रोशनीला होती. त्यात त्या मुलीला वडिलांसोबत राहायचे होते. तिचा उदित सोबत राहण्यास विरोध होता.त्यातूनच तिच्या हत्येचा विचार रोशनीच्या मनात आला.
बॉयफ्रेंडसोबत रात्रभर केली पार्टी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोशनीने उदितसोबत मिळून तिच्या मुलीची हत्या केली. आधी मुलीला मारहाण केली. नंतर पायाने तिचा गळा दाबून हत्या केली. मुलीची हत्या केल्यानंतर रोशनी आणि उदितने मुलीचा मृतदेह एका पिशवीमध्ये टाकला. ती पिशवी एका खोक्यात टाकली.
काही तासांनंतर जेव्हा खोक्यातून वास यायला लागला, तेव्हा तिने तो मृतदेह बाहेर काढला आणि एसीसमोर ठेवला. त्यानंतर ती बॉयफ्रेंड उदितसोबत लखनौतील एका हॉटेलमध्ये गेली आणि दोघांनी रात्रभर पार्टी केली.
रोशनीनेच पोलिसांना केला कॉल
त्यानंतर रोशनीने पोलिसांना कॉल केला आणि सांगितले की मुलीची तिच्या पतीने हत्या केली. पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाचा तपास सुरू केला. पण, रोशन सतत माहिती देताना चुका करत असल्याचे बघून तिच्यावर संशय आला. पोलिसांनी तिची चौकशी केली. त्यात तिने बॉयफ्रेंडसोबत मिळून हत्या केल्याची कबुली दिली.