विद्यार्थ्यांसोबत झालं प्रेम ; नवऱ्याचा बजावला गेम

प्रियकरा सोबत परदेशात पळून जायचा होता प्लॅन
जयपूर /नवप्रहार मीडिया
शिल्पा के एका कोचिंग क्लास मध्ये रिसेपनिस्ट म्हणून कामाला होती. मोहम्मद शकील याला परदेशात नोकरी साठी जायचे असल्याने तो त्या ठिकाणी आला होता. पण शिल्पाला मोहम्मद इतका आवडू लागला की ती विवाहित असून मुलाबाळांची आई आहे हे सुद्धा विसरली. मोहम्मद वर जीव जडल्याने तिचे मोहम्मद सोबत बाहेर फिरणे आणि इतर गोष्टी वाढल्या. मोहम्मद शकील च्या प्रेमात आकंठ बुडालेल्या शिल्पाने सरळ नवऱ्याला संपवण्याचा निर्णय घेतला.तिला प्रियकर मोहम्मद शकील सोबत परदेशात पळून जायचे होते म्हणून तिने हा निर्णय घेतला. राजस्थानच्या हनुमानगढमधील हे प्रकरण आहे.
शिल्पा खेमका अस तीच नाव .शिल्पा ही कोचिंग क्लासमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून नोकरीला होती. याच दरम्यान तिची मोहम्मद शकीलबरोबर ओळख झाली. शिल्पा शकील च्या प्रेमात पडली.शकील आणि शिल्पा दोघांच्या कॅफेमध्ये भेटीगाठी वाढू लागल्या. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. नवरा वाटेत अडथळा ठरत असल्यामुळे तिने त्याला मार्गातून हटवण्याचा निर्णय घेतला.
मोहम्मद शकीलला परदेशात जायच होतं. त्यासाठी त्याने तिथे क्लास लावलेला. शिल्पाने या गुन्ह्यामध्ये प्रियकराच्या मित्राची मदत घेतली. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केलीय. पोलिसांनी सांगितलं की, शिल्पाने नवऱ्याची हत्या करण्यासाठी प्रियकराच्या मित्राला 50 हजाराची सुपारी दिली होती. तिने आधी नवऱ्याच्या दूधात झोपेच्या गोळ्या मिसळल्या. त्यानंतर नवरा गाढ झोपेत असताना प्रियकराला आणि त्याच्या मित्राला बोलवून नवऱ्याची हत्या केली.
शिल्पाने कोचिंग क्लासमधला तिचा प्रियकर आणि त्याच्या एका मित्रासोबत मिळून हे कारस्थान प्रत्यक्षात आणलं. शिल्पा आणि तिच्या प्रियकराची नजर मृतक सुनील खेमकाच्या प्रॉपर्टी आणि पैशावर होती. शिल्पाने प्रियकरासोबत परदेशात पळून जाण्याच प्लानिंग केलं होतं.
शिल्पा बऱ्याचकाळापासून प्रियकरासोबत मिळून नवऱ्याच्या हत्येच प्लानिगं करत होती. याआधी सुद्धा पूर्ण योजनेसह नवऱ्याच्या हत्येचा प्रयत्न केला होता. पण त्यात यश मिळाल नव्हतं. शिल्पाने आधी पती सुनील खेमकाला झोपेच्या गोळ्या मिसळलेलं दूध पिण्यासाठी दिलं. सुनील गाढ झोपल्यानंतर तिने प्रियकर मोहम्मद शकीलला घरी बोलावलं. शिल्पाने हत्येसाठी प्रियकराच्या मित्राला 50 हजाराची सुपारी दिली होती. त्यामुळे शकीलसोबत त्याचा मित्रही आला.
शिल्पा आणि तिच्या प्रियकराने आधी उशीने सुनीलच तोंड दाबलं. त्यानंतर सुपारी घेणाऱ्याने चाकूने वार करुन सुनीलची हत्या केली. या प्रकरणी चौकशीनंतर पोलिसांनी शिल्पा तिचा प्रियकर आणि सुपारी घेणाऱ्याला अटक केलीय. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत.