सामाजिक
ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी गावपातळीवर आंदोलन होणे गरजेचे – प्रवीण वानखडे
वरुड / प्रतिनिधी
ओबीसीचे आरक्षण वाचण्यासाठी प्रत्येक खेड्या-पाड्यातून आंदोलन होणे गरजेचे, नाही तर येणाऱ्या काळात ओबीसी तरुणांच्या नोकऱ्या व शिक्षण व राजकिय आरक्षण धोक्यात येईल
मराठ्यांचे ओबीसीकरण करू नये, राज्य सरकारने आंदोलनाच्या दबावाखाली मराठ्यांना कुणबी जातीचे दाखले दिल्यास व ओबीसीतून आरक्षण देण्याचा प्रयत्न केल्यास तो ओबीसीवर अन्याय होईल अर्थात मराठा समाजालाआरक्षण देण्याचा विरोध नाही घटनादुरुस्ती करून त्यांना ओबीसी कॅटेगिरी वगळून स्वतंत्र प्रवर्ग तयार करून आरक्षण द्यावे.
राज्य पातळीवर बिहार राज्याच्या धरतीवर जात निहाय जनगणना करून ओबीसींना न्याय द्यावा आणि मराठ्यांचा आरक्षणाचा प्रश्न निकाली काढावा, तसेच सन 2023-24 हे शैक्षणिक वर्ष चालू झाले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री मा.श्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या अधिवेशनात राज्यात ओबीसीची 72 वस्तीगृहे लवकर सुरू केले जातील असे जाहीर केले होते. ज्या ठिकाणी जागा नाही त्या ठिकाणी खाजगी इमारती भाड्याने घेण्याबाबतची घोषणा केली होती. शिवाय वस्तीगृहाची यवस्था होईपर्यंत विद्यार्थ्यांना स्वाधार योजना लागू केली जाईल. असे म्हटले होते परंतु आजपर्यंत कोणतीही कार्यवाही झाली नाही तरी लवकरात लवकर मुले व मुली यांच्या साठी स्वतंत्र सरकारी वस्तीगृहे सुरू करण्यात यावी.
यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे विदर्भ उपाध्यक्ष प्रवीण वानखडे, जिल्हा संपर्क प्रमुख रविराज पुरी,तालुका अध्यक्ष केशव खेरडे, युवा तालुका अध्यक्ष सुरज धर्मे, युवा संघटक सौरभ धांगे, मोर्शी विधानसभा अध्यक्ष विनोद राऊत, प्रहार तालुका प्रमुख डॉ. महेंद्र राऊत शेंदुरजनाघाट युवा शहर अध्यक्ष निखिल वव्होकर राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थ्यी महासंघ तालुका अध्यक्ष पवन गोरडे राष्ट्रीय ओबीसी किसान शेंदुरजनाघाट शहर अध्यक्ष सुनील देशमुख माजी जिल्हा परिषद सदस्य गोपाल भाऊ मालपे कुषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती बबलु ऊर्फ नरेंद्र भाऊ पावडे प्रहार तालुका अध्यक्ष प्रनव कडु गोपाल भाकरे बीरसा मुंडा क्रांती दल जिल्हा अध्यक्ष प्रा कमल नारायण उयके विद्यार्थी महासंघ तालुका उपाध्यक्ष अंकुश देवते तालुका संघटक पुरुषोत्तम पोटोडे तालुका युवक संघटक राजेंद्र निकम वरुड तालुका उपाध्यक्ष सचिन जैस्वाल राजुराबाजार सर्कल प्रमुख विकास भोंडे प्रवीण शेडके माजी नगरसेवक बेलसरे अभिजित चौधरी योगेश लेकुरवाळे साहील मालपे अक्षय इंगळे गोपाळ देशमुख नरेंद्र नानोटकर कैलास सावरकर कीसना वानखडे तेजराज चोरे हरीओम ठाकरे डॉ रोषन नीकम सुभाष कदम लिलाधर बारस्कर व तसेच अनेक ओबीसी बांधव, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.