शेतकरी महिला बँकेचे ठेवीदार जिल्हा कचेरीवर धडकले
शेतकरी महिला निधी बँकेत अडकले नागरिकांचे कोट्यावधी
आमदार पंकज भोयर यांच्या नेतृत्वात आक्रोश मोर्चा
– ठेवीदारांना पैशे मिळत नसल्याने आक्रोश मोर्चा
– संचालकाची मालमत्ता शासनाने ताब्यात घ्यावी ठेवीदारांची मागणी
– मागील चार महिन्यापासून संचालकाचे तारीख पे तारीख
– शासनान तातडीने पावले उचलावी, ठेवीदारांची मागणी
आशिष इझनकर
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
– शेतकरी महिला निधी बँकेत जिल्ह्यासह बाहेर जिल्ह्यातील ठेवीदारांचे कोट्यावधी रुपये अडकले आहे. या बँकेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाह नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती. मात्र बँकेच्या संचालकाने नागरिकांच्या पैश्यावर स्वतः मालमत्ता खरेदी केल्याची माहिती आहे. ठेवीदार जेव्हा पैसे मागायला गेले तर पैशे नसल्याची बाब समोर आलीय.मागील चार महिन्यांपासून संचालकाने ठेवीदारांना केवळ तारीख पे तारीख देत ताटकळत ठेवले. अखेर संतप्त ठेवीदारांनी आज वर्धेत मोर्चा काढत संचालकाची मालमत्ता ताब्यात घेण्याची मागणी शासनला केलीय.
व्हिओ – शरद कांबळे नामक इसमाने वर्धा शहरसह ग्रामीण भागात शेतकरी महिला निधी बँक उघडलीय. या बँकेच्या माध्यमातून कर्मचारी ठेवत ग्रामीण भागातील नागरिकांच्या ठेवी जमा करण्यात आल्या. याच ठेवीच्या भरोश्यावर शरद कांबळे यांनी वाटर पार्क यासंह इतर मालमत्ता स्वतः विकत घेतल्या. जेव्हा ठेवीदार बँकेत आपले पैशे मागायला गेले तर त्यांना देण्यास टाळाटाळ करण्यात आलीय. प्रकरण पोलिसांत पोहचल्यावरही पोलिसांना कांबळे मागील चार महिन्यापासून वेगवेगळ्या तारीख देत आहे. यामुळे संतप्त नागरिकांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत कांबळे यांची मालमत्ता शासनाने ताब्यात घेण्याची मागणी केलीय. या मोर्चात वर्धेचे आमदार पंकज भोयर सुद्धा उपस्थित होते.
– शेतकरी महिला निधी बँकेत जवळपास 28 कोटी रुपये नागरिकांचे अडकले आहे.हे पैसे नागरिकांना परत कसे लवकर मिळतील या दृष्टीने शासनान तातडीने पावलं उचलावी. येत्या अधिवेशनात हा मुद्दा उचलणार असून नागरिकांच्या ठेवी परत मिळविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याच आमदार पंकज भोयर यांनी सांगितलंय
– पंकज भोयर, आमदार