राजकिय

प्रशांत भूषणने वर्तविला अंदाज भाजपा ला।मिळणार ईतक्या जागा 

Spread the love
  देशात लोकसभा निवडणुकीसाठी शेवटच्या (सातव्या)  टप्प्याच मतदान संपलं आहे. . संध्याकाळी त्यानंतर लगेच एक्झिट पोलचे आकडे यायला सुरुवात होईल. एक्झिट पोलच्या आकड्यावर निकालाच्यादिवशी साधारण काय चित्र असणार ते स्पष्ट होतं.

आतापर्यंत एक्झिट पोल फार कमीवेळा चुकले आहेत. त्यामुळे मतदान संपातच जाहीर होणाऱ्या एक्झिट पोलच्या आकड्यांकडे सगळ्यांच लक्ष लागलं आहे. प्रसिद्ध निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी एक्झिट पोलला काही तास उरले असताना पुन्हा एकदा आपला अंदाज जाहीर केला आहे. याआधी त्यांनी 2024 लोकसभा निवडणुकीत भाजपाला 300 च्या आसपास जागा मिळतील असा अंदाज वर्तवला होता. आता सुद्धा ते आपल्या याच आकड्यावर ठाम आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने जितक्या जागा जिंकल्या तितक्या किंवा त्यापेक्षा थोडी जास्त सुधारणा होऊ शकते, असं प्रशांत किशोर यांचं मत आहे.

“माझ्या मते भाजपा पुन्हा सत्तेवर येईल. उत्तर आणि पश्चिम भारतात त्यांना फार नुकसान होणार नाही” असं प्रशांत किशोर यांचं विश्लेषण आहे. “2019 लोकसभा निवडणुकीत भाजपाने 303 जागा जिंकल्या होत्या. उत्तर आणि पश्चिम भारतात भाजपाला फार मोठा फटका बसणार नाही. ते दक्षिण आणि पूर्वेतून ते नुकसान भरुन काढतील. त्यामुळे वेगवेगळ्या प्रदेशात भाजपाची कामगिरी संतुलित असेल” असं प्रशांत किशोर म्हणाले.

भाजपाच्या जागा कुठून वाढणार?

“पूर्व आणि दक्षिण भारतातून भाजपाच्या जागा आणि मतांची टक्केवारी वाढणार आहे. म्हणून मी म्हणतोय की, 2019 इतक्या भाजपाच्या जागा येतील” असं प्रशांत किशोर म्हणाले. ओदिशा आणि पश्चिम बंगालमध्ये प्रस्थापित सरकारविरोधात लाट आहे. त्यामुळे पूर्व भारतातून भाजपाच्या जागा वाढू शकतात. “पूर्व आणि दक्षिणमध्ये लोकांना भाजपाचा अजून अनुभव नाहीय. त्यामुळे ते त्यांना संधी देतील. तेलंगणमध्ये भाजपाचा विस्तार होईल. आंध्र प्रदेशमध्ये त्यांची आघाडी आहे. तामिळनाडू, करेळ या भागातही भाजपाची मतांची टक्केवारी वाढू शकते” असं प्रशांत किशोर म्हणाले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close