जेवणा मधून बेचाळीस विद्यार्थ्यांना विषबाधा
◆चाळीस विद्यार्थी स्थिर दोन दक्षता विभागात दाखल
◆तालुक्यातील हूडी बु.येथील घटनेने सर्वत्र खळबळ
राजेश सोनुने प्रतिनिधी पुसद
तालुक्यातील हूडी बु.येथील घटनेने सर्वत्र विद्यार्थी व पालकांमध्ये चिंचेचे वातावरण निर्माण झाले पुसद तालुक्यातील मल्हाराव होळकर प्रतिष्ठान नवीन पुसद व्दारा संचालीत गिरधारी महाराज आश्रम शाळा हुडी बु.येथे वस्तीगृहातील सकाळी ९:३० वाजताच्या दिलेल्या जेवणातून विद्यार्थ्यांना झाली विषबाधा सकाळी दहा चे जेवण आटोपल्या नंतर अचानक काही विद्यार्थ्यांना मळमळ, चक्कर,उलट्या झाल्या तेव्हा बघता ३० ते ४२ विद्यार्थी यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने विषबाधेचा प्रकार समोर आला. माहूर तालुक्यातील इवळेश्वर,शिवूर यासह म्हैसमाळ,बेलोरा,वडद,हुडी या गावचे विद्यार्थी विषबाधेत समाविष्ट आहेत.
त्यामुळे तात्काळ डॉ.प्रकाश राठोड यांचे विधिलिखित या खाजगी दवाखान्यांमध्ये तीस विद्यार्थी विद्यार्थिनी व लाईफ लाईन हाॅस्पीटल मध्ये दहा विद्यार्थी तर आयकॉन हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात समृद्धी येणकर, विनायक ठाकरे या दोन विध्यार्थ्यांना उपचारार्थ दाखल करण्यात आले. स्थानिक तीन वेगवेगळ्या खाजगी दवाखान्यामध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात केले आहे.
सदर विषबाधेत घटनेमुळे उर्वरित विद्यार्थ्यांना पालकांनी आप आपल्या घरी गावी घेऊन जात आहेत. शासकिय आश्रम शाळेतील भोजन नियमावली नुसार विद्यार्थ्यांना नियोजित पालन पोषण आहाराच्या ठराविक तक्त्याप्रमाणे जेवण दिले जात नाही नसल्याचे पालकांच्या प्रतिक्रियेतून समोर आल्याने एकच खळबळ उडाली. विद्यार्थ्यांना मळमळ उलट्या व श्वास घेण्यास त्रास होत असल्याने विषबाधेचा प्रकार समोर आला असून तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
◆विद्यार्थ्यांना सकाळच्या जेवणात स्वयंपाक कमी पडल्याने आम्हास रात्रीचे शिळे अन्न गरम करून जेवणात दिल्याने मळमळ, उलट्या होऊ लागल्याने 42 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचे कळते.
◆माझ्या विधी लिखित हॉस्पिटलमध्ये मुलांना भरती केल्यानंतर प्राथमिक स्टेजला त्यांना मळमळ ,उलट्या ,श्वास घेण्यास त्रास ,छाती दुखणे अशा समस्या जाणवत होत्या मी त्यांच्यावर योग्य उपचार करीत असून काही विध्यार्थ्यांना मी डिस्चार्ज दिले असून अजून बरेच मुलं माझ्याकडे भरती आहेत त्यांच्या प्रकृतीत सुधारना होत असल्याचे विधिलिखित हॉस्पिटल चे संचालक डॉ प्रकाश राठोड यांनी सांगितले.
◆ संस्था चालकाची पोलीस प्रशासन व समाज कल्याण विभाग तसेच तहसील प्रशासनाकडून चौकशी सुरू असल्याने संस्थाचालक शंकर करे यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.