सामाजिक
कारंजा लाड येथे मतदान जनजागृती सायकल रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी घेतले सहभाग
कारंजा प्रतिनिधी / डॉ. गुणवंत राठोड
मतदान जनजागृती सायकल रॅली
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघ, कारंजा विधानसभा मतदार संघ आयोजित महिला मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जनजागृती स्विप् सायकल रॅली झाशी राणी चौक क्रीडा संकुल येथून सकाळी साडेसात वाजता आयोजित करण्यात आली. या रॅलीचे उद्घाटन मा. जिल्हाधिकारी मॅडमच्या हस्ते करुन त्याच्या नेतृत्वात रॅलीसाठी मा.तहसीलदार श्री.झालटे साहेब, गटशिक्षणाधिकारी श्री.माने साहेब आणि तहसील कर्मचारी यांच्यासह तीनशे लोकांचा सहभाग होता तसेच आर. जे. चवरे हायस्कूल व काॅन्व्हेंटचे वर्ग आठवीचे विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृती फलक हाती घेऊन नागरिकांनी मतदान करावे व आपली नैतिक जबाबदारी पार पाडण्याविषयी जनजागृती केली.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1