क्राइम

ठाणेदा सुरज तेलगोटे यांची प्रशंसनीय कामगिरी ; 48 तासात खुनाच्या आरोपींना केलें जेरबंद

Spread the love
वरिष्ठांनी केले कार्याचे कौतुक
मंगरूळ दस्त / प्रतिनिधी
               बोरगाव धांदे येथील खुनाच्या गुन्ह्यात फरार आरोपींना केवळ 48 तासाच्या आत शोधून अटक करण्यात आली आहे. ठाणेदार सुरज तेलगोटे यांच्या या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत असून त्यांच्यावर वरिष्ठांसह सामान्य जनते कडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
                   अभिषेक मारोतराव गायकवाड 20 याने डंक उर्फ रितीक श्रीवास या युवकाला डोक्यावर फरशी मारून जखमी केले होते. रितीक आणि त्याचे सहकारी या कृत्याचा बदला घेतील म्हणून अभिषेक बोरगाव धांदे येथे त्याच्या मित्राच्या घरी स्वतःला सेफ करण्याच्या उद्देशाने आला होता. दरम्यान रितीक श्रीवास हा आपल्या काही साथीदारांना दुचाकी ने घेऊन बोरगाव धांदे येथे आला होता. आणि त्यांनी फावड्याचा दांडा आणि चाकूने मारहाण केली होती. त्यात अभिषेक गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी सावंगी मेघे येथे भरती केले असता उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला होता
        त्यावरून मंगरूळ दस्तागिर पोलिसांनी
अप.क्र.154/2023 कलम 302, 120(b), 143, 144, 147, 148, 149, IPC  नुसार खुनाचा गुन्हा दाखल करून दोन आरोपींना अटक केली होती. तर सात आरोपी फरार झाले होते. त्यांच्या शोधार्थ मंगरूळ ठाणेदार सुरज तेलगोटे यांनी दोन पथक तयार केले होते. आज उर्वरित सात आरोपींना
अटक करून सर्व नऊ आरोपी नामे रितीक उर्फ डंक अनिल श्रीवास   वय 24 वर्ष रा. सुभाष नगर पुलगाव  , तुषार उर्फ बारक्या नरेन्द्र धांदे वय 24 वर्ष बोरगांव ह.मु. पुलगाव ,  स्वराज उर्फ श्याम दिलीपराव काळे वय 23 वर्ष रा.पुलगाव  , सौरव उर्फ चापट सोमेश्वर वर्गने वय 20 वर्ष रा.पुलगाव
, ऋषीकेश उर्फ नेता उर्फ फेसबुक हरिचन्द्र म्हसके वय 27 वर्ष रा.बोरगाव धांदे हमु पुलगाव  ,शेरा उर्फ सौरव बबन मारबदे वय 18 वर्ष  रा. हिगणघाट फैल पुलगाव , अनिकेत भाऊराव बोंदीले वय 22 वर्ष रा. पुलगाव  , रवि उर्फ पप्पी रुपराव मेश्राम वय 24 वर्ष रा. हरिराम नगर पुलगाव
यांना दिनांक 17/3/23 चे रात्रोला गुन्ह्यात अटक करण्यात आली. सर्व अटक आरोपींना मा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी कोर्ट धामणगाव रेल्वे येथे पेश केले असता माननीय कोर्टाने तीन दिवसांचा PCR दिला आहे. पुढील तपास मा पोलीस अधीक्षक अविनाश बारगड, अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत सातव यांचे मार्गदर्शनात ठाणेदार सुरज तेलगोटे, पोहवा महादेव पोकळे अतुल पाटील, अवधूत शेलोकार, रमेश हलामी, सतीश ठावकर, मोशीन शहा, निशांत शेंडे, संदीप पाटील, अमोल हिवराळे, जीवन लांडगे मंगरूळ रस्तागीर पोलीस करीत आहेत.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close