Uncategorized

प्रॅक्टिकल रूम मध्ये असलेल्या बेड वर मुख्याध्यापक आणि शिक्षिका करत होते भलतेच प्रॅक्टिकल

Spread the love

                  वर्तमान काळात शाळा ज्याला विद्यामंदिर देखील म्हणतात पूर्वी सारखे राहिले नाही. आता शिक्षक – विद्यार्थी , शिक्षक – शिक्षिका यांच्या रोमान्स ची जागा म्हणून विद्यामंदिर ओळखले जाऊ लागले आहे. अर्थात सर्वच शाळा अशा आहेत असे नाही. पण काही शाळेत आणि महाविद्यालयात घडलेल्या अशा चुकीच्या प्रकारामुळे जनतेचा सगळ्या शाळांकडे पाहण्याचा दृष्टिकोन मात्र बदलतो.

बीहार राज्यातील वैशाली जिल्ह्यातील महुआ येथील हरपुर मिर्झानगर उच्च माध्यमिक शाळेत  जो प्रकार उघड झाला आहे. त्यामुळे शिक्षा क्षेत्र हादरून गेले आहे. या शाळेत प्रभारी मुख्याध्यापक हेमंत कुमार यांना त्यांच्या एका सहकारी शिक्षिकेसोबतच्या नको ते वर्तन केल्यामुळे निलंबित करण्यात आले आहे.

या प्रकरणाची तक्रार ई-शिक्षा कोष पोर्टलवर पुराव्यानिशी करण्यात आली होती. यानंतर जिल्हा कार्यक्रम अधिकारी शशि रंजन यांनी तत्काळ कारवाई करत हेमंत कुमार यांना निलंबित केले असून त्यांच्यावर विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच ही चौकशी ४५ दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

सीसीटीव्हीमध्ये कैद व्हिडिओनंतर उघड झाली बाब

प्रकरणात मुख्याध्यापक आणि शिक्षिका यांचा नको ते चाळे करण्याचा एक व्हिडिओ सीसीटीव्हीत आढळून आला, ज्यात शाळेच्या प्रयोगशाळेमध्ये बेड ठेवलेला दिसून आला. त्यामुळे प्रयोगशाळेचा वापर शाळेच्या उद्देशाला न धरून भलत्याच कारणासाठी केला जात असल्याचा संशय निर्माण झाला. प्रयोगशाळेच्या चाव्या मुख्याध्यापकांकडेच असल्याची माहिती नाईट चार्जने दिली.

शाळेतील शिक्षकांनी याबाबत बोलण्यास टाळले

जवळपास सगळ्या शिक्षकांनी चौकशीदरम्यान काहीही बोलण्यास नकार दिला. प्रखंड शिक्षाधिकारी अर्चना कुमारी यांनी शाळेची पाहणी केली आणि यावरून शाळेतील वातावरणावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.

शिक्षिकेवरही होणार कारवाई

फक्त मुख्याध्यापकच नव्हे, तर संबंधित शिक्षिकेवरही शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. शाळेच्या वातावरणाला दूषित करण्याच्या तसेच प्रयोगशाळेमध्ये बेड आढळून आल्याने आणि तेथे नको ते पराक्रम केल्याने ही कठोर कारवाई करण्यात आली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close