हटके

शक्तिवर्धक गोळ्या , दारू आणि प्रेयसी पण  तरुणाचा तडफडून मृत्यू

Spread the love

ग्वाल्हेर / विशेष प्रतिनिधी

                   तो आणि ती एकमेकांच्या परिचयाचे आणि परस्परांच्या प्रेमात पडलेले. तो इंदूर चा तर ती दिल्लीची . त्या दोघांनी ग्वाल्हेर येथे भेटण्याचे ठरवले. त्याने  थाटीपूरच्या मयूर मार्केटमधील हॉटेल मॅक्सनमध्ये त्यांनी रूम बुक केली . त्याने प्रेयसी सोबत रात्र घालवण्यासाठी दारूचे आणि शक्तिवर्धक गोळीचे सेवन केले. पण अचानक रात्री त्याची तब्येत खलावली. प्रेयसी ने त्याला हॉटेल च्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने रुग्णालयात नेले पण तोंपर्यंत त्याने प्राण सोडले होते.

हिमांशू असे त्या तरुणाचे नाव आहे.

रात्री ९ च्या सुमारास त्याची प्रेयसी दिल्लीहून त्याला भेटायला आली. हिमांशुने दारू आणि सिगारेटचे सेवन केले होते, ज्याला त्याच्या प्रेयसीने थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने तिच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करून दारू पिणे सुरू ठेवले.

मध्यरात्रीनंतर हिमांशुने एक सेक्स वर्धक गोळी घेतली, ज्यामुळे त्याची प्रकृती बिघडली. श्वास कोंडल्यासारखे वाटू लागल्यामुळे तो रूमबाहेर तडफडत आला. त्याच्या प्रेयसीने घाबरून हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना बोलावले, परंतु हिमांशुला हॉस्पिटलमध्ये नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

डॉक्टरांनी प्राथमिक तपासात दारू आणि सेक्स वर्धक गोळीच्या एकत्र सेवनामुळे हा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला आहे. पोलिसांनी पोस्टमार्टेम अहवालाची प्रतीक्षा करत असल्याचे सांगितले आहे, ज्यामुळे मृत्यूचे नेमके कारण समजू शकेल. ही घटना हॉटेलमधील कर्मचाऱ्यांसह पोलिसांना हादरवून टाकणारी ठरली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
2
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close