सामाजिक

स्व. तेजस नांदगावकर यांचे मरणोत्तर नेत्रादान

Spread the love

कारंजा (लाड)प्रतिनिधी गुणवंत राठोड –
चवरे लाईन कारंजा लाड येथील रहिवासी स्व. तेजस अविनाश नांदगावकर यांचे वयाच्या ४४ व्या वर्षी २७ मार्च रोजी हृदय विकाराचा झटक्याने दुःखद निधन झाले. निधनानंतर नांदगावकर कुटुंबाने आपल्यावरील दुखाचा डोंगर बाजुला सारून त्यांचे वडील अविनाश नांदगावकर, पत्नी मुग्धा व पुत्र तनय भाऊ अतुल नांदगावकर, संजीव नांदगावकर अनुप नांदगावकर, शशिकांत नांदगावकर, अविन नांदगावकर यांच्या पुढाकाराने गरजूंना या जगातील रंग पाहता यावे या उदात्त भावनेने नेत्रदानाचा निर्णय घेतला. अमरावती येथील दिशा इंटरनॅशनल आय बँक या धर्मदाय नेत्रपेढीला श्री सुधीर देशपांडे यांनी संपर्क केला. दिशा इंटरनॅशनल आय बँकेचे हिमांशू बंड व सचिव स्वप्निल गावंडे, अनिल देशमुख ही मंडळी तात्काळ कारंजा येथे येऊन यांनी मरणोत्तर नेत्रकमळ दान करून घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली. यावेळी दिशा ग्रुप कारंजाचे
डॉ संजय किटे, डॉ अजय कांत, डॉ शार्दुल डोंणगावकर, डॉ. विजय जवाहरमलानी, डॉ सुशील देशपांडे, डॉ. उल्हास काटोले, डॉ मनीष राऊत, डॉ अमोल उगले, प्रा राजा गोरे समीर देशपांडे, आशिष तांबोळकर, प्रफुल्ल वानखडे, सुदर्श न दर्यापूरकर, ओजस बंड, प्रांजल दर्यापूरकर, अनुप परळीकर, प्रज्वल गुलालकरी उपस्थित होते. नेत्रदानाच्या सेवाभावी कार्यासाठी परिवारातील इतर सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्याबद्दल दिशा एजुकेशन फाऊंडेशन व दिशा इंटरनॅशनल आय बँकच्या सर्व संचालक मंडळाने व कार्यकर्त्यांनी नांदगावकर कुटुंबीयांचे आभार व्यक्त केले व स्व. तेजस अविनाश नांदगावकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. भारतासमोर अंधत्व हि फार मोठी समस्या उभी आहे. एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दोन कॉर्नियल अंधांना दृष्टी प्राप्त होऊ शकते. उच्च रक्तदाब, मधुमेह, अस्थमा असे आजारअसलेल्या व्यक्तीचे देखील नेत्रदान केले जाऊ शकते तसेच चष्मा असलेले व मोतीबिंदूचे ऑपरेशन झालेल्या व्यक्तीचे सुध्दा नेत्रदान केले जाऊ शकते. मृत्यूनंतर सहा ते आठ तासापर्यंत नेत्रदान केले जाऊ शकते. त्यामुळे मृत्युनंतर ताबडतोब दिशा इंटरनॅशनल आय बँकेला संपर्क करावा. मृत व्यक्तीचे डोळे उघडे असल्यास ते बंद करावे व त्यावर ओले कापसाचे बोळे ठेवावे. मृत व्यक्तीच्या डोक्याखाली २ उशा ठेवाव्या.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close