क्राइम

बिहार मध्ये पाहायला मिळाले गुन्हेगारांचे जंगल राज

Spread the love

महिला अधिकाऱ्याला लाथा बुक्क्यांनी , दगडाने मारहाण .

पाटणा ( बिहार )/ नवप्रहार न्यूज नेटवर्क

          बिहार मध्ये  कायदा व सुव्यवस्था आहे की नाही हेच कळत नाही. कुठल्या राज्यात कोणी जोर जबरदस्ती केली तर येथे काही बिहार राज आहे काय ? असे उपहासाने म्हटल्या जाते. याच बिहार मध्ये जंगलराज आहे की काय ? हा प्रश्न नुकत्याच एका घटनेवरून उपस्थित झाला आहे. येथे अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी गेलेल्या एका महिला अधिकाऱ्याला दगड आणि लाथेने मारहाण केल्याचा क्लेशदायक प्रकार घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी महिला अधिकाऱ्याला दगड फेकून तर खाडी पडल्यानंतरही लाथाने मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून पोलिसांनी या व्हिडिओला दुजोरा दिला आहे. तर या व्हिडिओमध्ये काही तरूणही सहभागी झाले असल्याचं दिसत आहे.

या घटनेनंतर पोलिसांनी तब्बल ४४ लोकांना अटक केली असून या छाप्यावेळी तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अधिकचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close