अंजनगाव सुर्जी तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत सहकार ने मारली बाजी
मनोहर मुरकुटे / अंजनगाव सुर्जी
शेतकऱ्यांची आधार म्हणून असलेली एकमेव संस्था म्हणून प्रचलित असलेली संस्था म्हणजे अंजनगाव सुर्जी खरेदी विक्री संस्था होय याच खरेदी विक्री संस्थेद्वारे शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारे साहित्य असो की रासायनिक खतांचा पुरवठा असो ही व्यवस्था या खरेदी विक्री संस्थेमधून आतापर्यंत होत आली त्यामुळे संस्थेला महत्त्व प्राप्त आहे अशा या संस्थेची निवडणूक दिनांक 19 मार्च रोजी झाली असुन दिनांक 20 मार्च रोजी या निवडणुकीचा निकाल लागला आहे यामध्ये अक्षरशा परिवर्तन पॅनल चा धुवा उडवत सहकार पॅनलने आपली बाजी महाराज बाजू मजबूत केली आहे.
अंजनगाव सुर्जी खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत 17 पैकी 15 जागांवर सहकार पॅनल विजय प्राप्त केल्याने पुन्हा एकदा तालुक्यातील सहकार मध्ये आपले निर्विवाद वर्चस्व असल्याचे सिद्ध केले आहे.
गेल्या दोन वर्षापासून सहकारातील प्रलंबित असलेल्या निवडणुका लागण्यास हळूहळू सुरुवात झाली आहे त्यापैकी याच महिन्यात किसान जिनिंग अँड प्रेसिंग ची निवडणूक गेल्या तीन तारखेला झाली होती त्यात सहकार पॅनल ला निसटता विजय प्राप्त झाला होता. आणि याच गोष्टीची दखल घेत खरेदी विक्री संघाच्या झालेल्या निवडणुकीत सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघातून 8 पैकी 7 उमेदवार सहकार पॅनल चे निवडून आले ज्यात गजानन धोटे 31, शरद कडू 29, नरेंद्र येवले 29,अंकुश सरोदे 29, हिम्मतराव ढोक 28 रवी पोटे 28, गुरुदास वानखडे 28 अरुण चौखंडे 26 मते घेऊन विजयी झाले आहे .तर वैयक्तिक मतदार संघातून 9 पैकी 8 उमेदवार सहकार पॅनलचे तर एक उमेदवार परिवर्तन पॅनल चा निवडून आले यामध्ये वैयक्तिक पुरुष मतदार संघातून गजानन दुधाट. 1334, शंतनू भाबुरकर1276,मोहन ठाकरे 1247,नंदकिशोर काळे 1226 एवढी मते घेऊन हे चार उमेदवार विजयी झाले आहेत. महिला मतदारसंघातून अर्चना पखान 1452 ,सपना शिंगणे 1369 , अनुसूचित जाती मतदार संघातून गजानन लवटे 1353 , भटक्या विमुक्त जाती मतदारसंघातून अरुण नवले 1339, इतर मागास वर्गातून भुजंग कोकाटे 1359 एवढी मते घेऊन विजयी झाले असून माजी सभापती अरुण खारोळे यांचा पराभव झाला.