राज्य/देश

पूजा खेडकर यांनी ११ वेळा यूपीएससी परीक्षा दिल्याचा आरोप 

Spread the love

पुणे / नवप्रहार डेस्क

                   आपल्या अजब वागण्याने प्रसिद्धीस ? आलेल्या पूजा खेडकर यांचे एकापाठोपाठ एक कारनामे उघड होत आहेत. आता तर असा करारनामा उघड झाला आहे की तुम्हीही आश्चर्याने तोंडात बोट घातल्याशिवाय राहणार नाही. या बयेने तब्बल ११ वेळा यूपीएससी परीक्षा दिल्याचा आरोप आहे. यासाठी तिने आपल्या नावात बदल केल्याचे देखील बोलल्या जात आहे. .

पूजा खेडकर यांनी ११ वेळा युपीएससी परीक्षा दिली. नावात बदल करून त्यांनी ही परीक्षा दिली असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे आता पूजा खेडकर यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. पूजा खेडकर आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात कारवाई होण्याची शक्यता आहे.

 

 

मिळालेल्या माहितीनुसार पूजा खेडकर यांनी नावामध्ये बदल करून यूपीएससीला गंडवण्याचा प्रयत्न केला. पूजा खेडकर यांचे यूपीएससीचे अटेम्प्ट संपले असतानाही त्यांनी नावात बदल करून पुन्हा यूपीएससीची परीक्षा दिल्याचा आरोप आहे. पूजा खेडकर ११ वेळा यूपीएससीची परीक्षा दिली. पूजा खेडकर यांनी २०१९-२० पर्यंत खेडकर पूजा दिलीपराव या नावानं यूपीएससीची परीक्षा दिली. तर २०२१ आणि २०२२ ला त्यांनी नावात बदल करत पूजा मनोरमा दिलीप खेडकर या नावाने यूपीएससीची परीक्षा दिली. UPSC मध्यें पूजा खेडकर यांच्या दोन्ही नावांच्या लिस्ट आहेत.

२०१९-२० पर्यंत पूजा खेडकरांनी यूपीएससी परीक्षा देताना वडिलांचे नाव दिलीपराव असे लिहिले होते. त्यातही स्पेलिंगमध्ये डी डबल ई लिहीले आणि नावाची सुरूवात आडनावापासून होत असे जसे सर्व महाराष्ट्रीय नावांमध्ये असते. मात्र २०२१ पासून त्यांनी पूजा मनोरमा दिलीप खेडकर असे नाव यूपीएससी परीक्षा देताना द्यायला सुरूवात केली. त्यांनी नावात आईचे नाव लिहायला सुरूवात केली आणि वडिलांचे नाव फक्त दिलीप केले. त्यांचे स्पेलिंग ही बदलण्यात आले. वडीलांच्या नावात डी डबल इ ऐवजी डी आय असे लिहिले. राज्य शासनाने  नावात आईचे नाव लावण्याचा निर्णय २०२४ मध्ये घेतला आहे. तर मग पूजा खेडकर यांनी २०२१ पासूनच आपल्या नावात आईच्या नावाचा समावेश केला होता. त्याआधी त्या आईचे नाव का वापरत नव्हत्या असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

पूजा खेडकर यांनी नावातील हा बदल फक्त यूपीएससीची अटेम्प्ट वाढवून मिळाव्यात यासाठी केला असल्याचा आरोप होत आहे. नावात बदल केल्याने पूजा खेडकर यांना त्यांच्या यूपीएससीचे अटेम्प्ट संपले असतानाही परीक्षा देत आल्या. त्यांनी नावात बदल केल्यानेच यूपीएससीच्या फिल्टरमध्ये त्या अडकल्या नाहीत. ओबीसी म्हणून पूजा खेडकर यांना ९ वेळाच यूपीएससीची परीक्षा दिली होती. त्यांचे हे अटेम्प्ट २०१९-२० मध्येच संपले असल्याची बातमी आहे. त्यामुळेच २०२० मध्ये आधी कॅटकडे म्हणजेच केंद्रीय प्रशासकीय प्राधिकरणाकडे याचिका केली. या याचिकेमधून त्यांनी बहुविकलांगत्वासाठी त्यांना यूपीएससीचे अटेम्प्ट वाढवून मिळावी. तसंच, एसटी आणि एसटी विद्यार्थ्यांप्रमाणं अमर्यादित संधी देण्यात याव्यात अशी मागणी केली होती. पण कॅटनं पूजा खेडकर यांची ही मागणी फेटाळली.

२०२१ आणि २०२२ मध्ये पूजा खेडकर यांनी यूपीएससीची परीक्षा दिली. त्यामुळे प्रश्न उपस्थित केला जातोय की, अटेम्प्ट वाढवून मिळण्यासाठी खेडकर यांनी कॅटचा दरवाजा का ठोठवाला होता. त्यांचे अटेम्प्ट संपले होते म्हणून असेल तर, मग खेडकर यांनी २०२१, २०२२ ची यूपीएससीची परीक्षा दिली कशी? आणि जर अटेम्प्ट संपले नव्हते तर मग त्यांनी कॅट पिटिशन का दाखल केली.

यूपीएससीचा नियम सांगतो की, उमेदवाराने अर्जात त्याच्या दहावीच्या प्रमाणपत्रावरील नावाप्रमाणे नाव लिहावे. म्हणजेच मराठी व्यवस्थे प्रमाणे आडनाव , स्वतःचे नाव शेवटी वडिलांचे नाव. पूजा खेडकर यांनी २०१९ पर्यंत याच पद्धतीनं नाव लिहित यूपीएससीची परीक्षा दिल्याचे दिसतं आहे. पण त्यांनी २०२१ पासून नावामध्ये बदल करून आईचे नाव लावण्यास सुरूवात केली. त्यामुळे आता त्यांच्या प्रमाणपत्रांची देखील तपासणी होण्याची शक्यता आहे. महत्वाचे म्हणजे, पूजा खेडकर यांची नोव्हेंबर २०२१ मध्ये स्पोर्टस अथॉरटी ॲाफ इंडियाच्या सहायक संचालक पदावर निवड झाली. त्यातही त्यांनी खेडकर पूजा दिलीपराव असेच नाव लिहिले आहे. अटेम्प्ट व्यातरिक्त विकलांगतेचे टायमिंग देखील संशयास्पद आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close