राजकिय

मराठा आरक्षणात मी आडकाठी ठरत असल्याचे सिद्ध झाल्यास राजकारण सोडेल – फडणवीस 

Spread the love

मुंबई / नवप्रहार डेस्क

                     मराठा आरक्षणाला घेऊन मराठा आरक्षण प्रणेते मनोज जरागे पाटील यांनी राज्यभर रान पेटवले होते. उपमुख्यामंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठा आरक्षणास आडकाठी आणत असल्याचा जरागे पाटील सतत आरोप करीत आहेत. त्यावर उत्तर देतांना फडणवीस यांनी मराठा आरक्षणात मी व्यत्यय आणत आहे. असे सिद्ध झाल्यास मी राजकारण सोडेल असे फडणवीस यांनी जाहीर केले आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘मी मनोज जरांगे पाटील यांना स्पष्ट सांगितले आहे की त्यांनी शिवसेना (यूबीटी) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेसकडून लिहून घ्यावे की सत्तेत आलो तर मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ.’

 

 

‘मनोज जरांगे पाटील मलाच का टार्गेट करत आहेत हे साऱ्या महाराष्ट्राला माहीत आहे. काही लोक काही लोकांच्या खांद्यावर बसून बंदुक चालवत आहेत. पण आता मराठा समाजालाही समजायला लागले आहे की यात राजकारण होत आहे’, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

‘ आरक्षणासाठी आम्ही सर्व पक्षांची बैठक बोलावली होती. त्या बैठकीला शरद पवार उपस्थित होते. नाना पटोले, उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे नेते उपस्थित होते. मराठा समाजाला आरक्षण द्यावे पण इतरांचे आरक्षणातून नको, असे सर्वच पक्षातील नेत्यांनी सांगितले. ते लेखी आहे.’ असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

‘मनोज जरांगे पाटील माझ्या आरोप करत आहेत की देवेंद्र फडणवीस हे आरक्षण मिळू देत नाहीत. पण मी सांगितले आहे आम्ही दोघे उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री मिळून निर्णय घेत असतो. मुखमंत्र्यांनी सांगितले की आरक्षण देण्यात मी काही अडचण निर्माण करत आहे तर मी राजकारण सोडले आणि राजकीय निवृत्ती घेईल’, असे आव्हान देवेंद्र फडणवीसांनी जरांगेंना दिले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close