क्राइम

खेदजनक…. ड्रग विक्री प्रकरणात पोलिस अधिकाऱ्याचा सहभाग 

Spread the love
पिंपरी चिंचवड / नवप्रहार मीडिया 
           जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. ड्रग्स विक्री प्रकरणात चक्क पिंपरी चिंचवडमधील एका फौजदाराला अटक करण्यात आली आहे. सांगवी पोलिसांनी गस्ती दरम्यान एका व्यक्तीकडून दोन किलो एमडी ड्रग्स जप्त केलं होतं. या ड्रग्सची किंमत तब्बल दोन कोटी रुपये इतकी आहे. या प्रकरणात नमामी झा नामक हॉटेल चालकाला अटक करण्यात आली होती.
  विद्यानगरी अशी ओळख असलेले पुणे शहर आता क्राईम सिटी अशी ओळख निर्माण करत असल्याचे पाहायला मिळत आहे. शहरात चरस, गांजा , अफीम इतकेच काय तर ड्रग्स शुद्ध सहज उपलब्ध व्हायला लागले आहे. येथे देशातील कान्याकोपऱ्यातून मुले येत असल्याने आणि घरापासून वेगळे राहत असल्याने मिळालेल्या फ्रीडम चा ते गैरफायदा घेत मित्रमंडळींच्या गोत्यावळ्यात अडकून व्यसनाच्या आहारी जातात. ड्रग्स प्रकरणात एका पोलीस अधिकाऱ्याचा सहभाग आढळून आल्याने पोलीस विभागात खळबळ माजली आहे.
मात्र आता या प्रकरणाला धक्कादायक वळण लागलं आहे. आरोपी नमामी झाकडे जे ड्रग्स आढळून आले त्यामध्ये पिंपरी चिंचवड पोलीस दलातील निगडी पोलिस स्टेशनचा अधिकारी विकास शेळके याचाही सहभाग असल्याचं  उघड झालं आहे. पोलिसांनी या प्रकरणात तातडीनं कारवाई करत विकास शेळके याला अटक केली आहे. झडतीमध्ये त्याच्याकडून तब्बल 45 कोटी रुपयांचं ड्रग्स जप्त करण्यात आलं आहे.
दरम्यान अटक करण्यात आलेल्या विकास शेळके याच्या मालकीच्या पिंपरी चिंचवड शहरात दोन ते तीन हॉटेल्स असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पोलीसही चक्रावून गेले आहेत. सध्या या प्रकरणाचा तपास आमली पदार्थ विरोधी पथकाकडून सुरू आहे. शेळके यानं यापूर्वी ड्रग्स तस्करी केली आहे का? या प्रकरणात आणखी कोणते अधिकारी सहभागी आहेत का याचा शोध सुरू आहे
या प्रकरणामुळे पुन्हा एकदा पिंपरी चिंचवड पोलीस दलाची मान खाली गेली आहे. कारण 15 दिवसांपूर्वीच पिंपरी चिंचवड पोलीस दलातील दोन कर्मचारी खंडणी उकळल्या प्रकरणी  निलंबित करण्यात आले होते. तर दोन अधिकाऱ्यांवर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याची लाच प्रकणात बदली करण्यात आली आहे
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close