क्राइम

व्यक्तीला खोट्या गुन्ह्यात अडकवणे पोलीस अधिकाऱ्यांना भारी पडले , गुन्हा दाखल 

Spread the love

मुंबई / नवप्रहार मीडिया 

अंधेरी येथील निवासी सदनिका बळकावणे व सदनिका मालकाला खोट्या गुन्ह्यांत अडकवल्याच्या आरोपाखाली एमआयडीसी पोलिसांनी शनिवारी संध्याकाळी दोन पोलिस अधिकाऱ्यांसह चौघांविरोधात गुन्हा दाखल केला.

                   याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.पोलीस तक्रारीनुसार, अंधेरी (पूर्व) येथील कदमवाडी येथील रविराज अपार्टमेंटमधील सदनिका युनियन बँकेने लीलाव प्रक्रियेद्वारे मोहिनी अरुण सावंत आणि त्यांची मुलगी सायली अरुण सावंत विकली होती. त्यावेळी विकसकाकडे काम करणाऱ्या आरोपी फारुकी इजाझ-उल-हक याने या सदनिकेची बनावट कागदपत्रे तयार केली आणि ती सदनिका जुन्या मालकाकडून विकत घेतल्याचा दावा केला.

त्या तक्रारीवर तक्रारदार व त्यांच्या मुलीला सदनिकेतून बाहेर काढण्यात आले. हकचा मुलगा रेहाननेही त्याला मदत केली. हक यांच्या सांगण्यावरून २०१८ मध्ये एमआयडीसी पोलिस ठाण्यात तैनात असलेले आरोपी पोलिस उपनिरीक्षक व पोलीस निरीक्षकाने तक्रारदार, त्याचे पती व मुलगी यांना जबरी चोरीच्या गुन्ह्यात २०१८ मध्ये अटक केली होती. त्यानंतर याप्रकरणी सावंत कुटुंबियांनी अंधेरी न्यायालयात धाव घेतली. त्याप्रकरणी न्यायालयाने ८ जानेवारी रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्याला हक, त्याचा मुलगा आणि दोन पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा नोंदवून या प्रकरणाचा अधिक तपास करण्याचे निर्देश दिले. न्यायालयाच्या निर्देशानुसार एमआयडीसी पोलिसांनी शनिवारी हक, रेहानसह दोन पोलीस अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close