क्राइम

व्यापाऱ्याच्या हत्येत पोलीस कॉन्स्टेबल आरोपी 

Spread the love

पत्नी सोबत अनैतिक संबंशाची होती शंका

 छत्रपती संभाजीनगर  / नवप्रहार मिडिया 

          वाळूज येथील व्यापाऱ्याची हत्या पोलीस कॉन्स्टेबल ने केल्याचे तपासात उघड झाले आहे. धक्कादायक माहिती म्हणजे ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस हेडकॉन्स्टेबल रामेश्वर काळे यानेच व्यापारी सचिन नरोडे यांना संपवले. रामेश्वर याला त्याच्या पत्नीचे व्यापाऱ्या सोबत अवैध संबंध असल्याचा संशय होता,.आणि त्यातूनच एका सहकाऱ्यांच्या मदतीने त्याने नरोडे याला संपवले होते.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, 17 मार्चच्या रात्री साडेसात ते आठ वाजेच्या दरम्यान एका अज्ञात व्यक्तीने व्यापारी सचिन साहेबराव नरोडे यांच्यावर गोळीबार केला. वाळूज परिसरातील साजापूर शिवारात डोक्यात बंदुकीची गोळी झाडून त्यांचा खून केल्याची तक्रार एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. तेव्हापासून गुन्हे शाखा आणि वाळूज पोलीस असे पाच पथके आरोपीचा शोध घेत होती.

गुन्ह्याचा शोध करत असताना गुन्हे शाखेच्या एका पथकाला त्यामध्ये यश आले आहे. हा खून ग्रामीण पोलीस दलात पोलीस कॉन्स्टेबल असलेल्या पोलिसाने केल्याचे निष्पन्न झाले त्याच्यासोबत एक साथीदार सुद्धा सोबतीला होता. विशेष म्हणजे हा रामेश्वर सिताराम काळे हेडकॉन्स्टेबल लाच लूजपत प्रतिबंधक विभागाच्या एका कारवाईमध्ये निलंबित करण्यात आला होता. तर त्याच्यावर 354 प्रमाणे छेडछाडीचा गुन्हा देखील ग्रामीण पोलीस दलात दाखल झालेला आहे.

आरोपी पोलीस हेडकॉन्स्टेबल रामेश्वर सिताराम काळे आणि लक्ष्मण जगताप यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस हेडकॉन्स्टेबल रामेश्वर काळे याला मृत व्यापारी सचिन नरोडे याचे आपल्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. मागील दोन महिन्यापासून आरोपी काळे हा मृत व्यापाऱ्याच्या मागावर होता. रविवारी रात्री साजापूर परिसरातील वीज नव्हती. त्याचा फायदा घेऊन आरोपीने व्यापाराच्या डोक्यात गोळी झाडून हत्या केली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close